कौटुंबिक वाद टोकाला गेला, सख्या भावानेच भावाचा घात केला, पण दैव बलवत्तर म्हणून…

दोघा भावांचा टँकरचा व्यवसाय आहे. पण लहान भावाला वाईट संगत लागल्याने त्याचे व्यवसायात लक्ष नव्हते. दारुच्या व्यसनामुळे भावा-भावांमध्ये वाद व्हायचे. यातून लहान भावाने भयंकर कृत्य केले.

कौटुंबिक वाद टोकाला गेला, सख्या भावानेच भावाचा घात केला, पण दैव बलवत्तर म्हणून...
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:36 PM

नवी मुंबई : कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावावर चाकू हल्ला केल्याची घटना नवी मुंबईतील सानपाडा येथे घडली. तेजस पाटील असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गंजलेला चाकून मानेत खुपसून भावाची हत्या करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र या हल्ल्यानंतर पीडित स्वतः मानेत चाकू घेऊन एक किमी बाईक चालवत एमपीसीटी रुग्णालयात गेला. यानंतर रुग्णालयात सुमारे चार तास यशस्वी शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी चाकू बाहेर काढला. तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे. पीडिताच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दोघा भावांचा टँकरचा व्यवसाय होता

तेजस पाटील हा व्यावसायिक आहे. तेजस पाटील आणि त्याचा भाऊ मोनिष यांचा पार्टनरशीपमध्ये टँकरचा व्यवसाय आहे. मात्र मोनिषला वाईट संगत लागल्याने तो व्यवसायात लक्ष देत नव्हता. मोनिषला दारुचे व्यसन आहे. यातून त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून मोनिषने आपल्या भावावर हल्ला केला. मात्र हा हल्ला नक्की याच कारणातून केला की अन्य काही कारण आहे? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

घरी कुणी नसल्याची संधी साधत हल्ला

तेजसवर हल्ला झाला तेव्हा मोनिषचा मित्रही तेथे उपस्थित होता. तेजसची बायको आपल्या माहेरी उलवे येथे गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधत मोनिषने हा हल्ला केला. हल्ल्यानंतर तेजसने डगमगून न जाता थेट बाईक काढली आणि रुग्णालय गाठले. यानंतर रुग्णालया प्रशासनाने सानपाडा पोलिसांनी घटनेची माहिती दिली. तेजसला रुग्णालयात दाखल करत डॉक्टरांनी चार तास अथक प्रयत्न करत तेजसच्या मानेतील चाकू बाहेर काढला. तेजसची प्रकृती आता स्थिर आहे. पोलिसांनी तेजसच्या जबानीवरुन मोनिषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.