बाजारात सामान आणण्यासाठी गेली होती महिला, दोन दिवसांनी थेट मृतदेहच सापडला, काय घडलं नेमकं?

सायंकाळच्या सुमारास 50 वर्षीय महिला बाजारात सामान आणण्यासाठी घरुन गेली. ती परतलीच नाही. दोन दिवस महिलेचा शोध सुरु होता. मात्र दोन दिवसांनी जे समोर आलं ते पाहून सर्वांना धक्का बसला.

बाजारात सामान आणण्यासाठी गेली होती महिला, दोन दिवसांनी थेट मृतदेहच सापडला, काय घडलं नेमकं?
पालघरमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 5:03 PM

पालघर : बाजारात सामान आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा थेट मृतदेह आढळल्याने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. पद्मावत बहादूर सिंग असे मयत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. महिलेची हत्या नेमकी कुणी केली?, कोणत्या कारणातून केली? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस घटनास्थळाचाही कसून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच महिलेची हत्या नेमकी कशी करण्यात आली हे उघड होईल.

सामान आणायला गेली ती थेट मृतावस्थेत आढळली

पालघरमधील सफाळे जवळील माकणे गावातील लेक मार्क अष्टर या इमारतीत ही महिला राहते. ही महिला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सामान आणण्यासाठी बाजारपेठेत गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह थेट शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात गळा आवळून महिलेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मात्र अधिक तपास सुरु आहे.

महिलेचे दागिने आणि मोबाईल गायब

महिलेच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन, कानातील झुमके आणि मोबाईल बेपत्ता असल्याने लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महिलेच्या जवळ असलेल्या पिशवीत रिकामं पाकीट आणि एका पिशवीत दारूची बाटली आढळून आली आहे. पालघरच्या पोलीस विभागीय अधिकारी नीता पाडवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणात अज्ञात इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.