
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (ncp leader rupali chakankar threat phone call)
रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात फोन करून तुमचे कार्यालय तोडून टाकू. जाळून टाकू, अशी धमकी त्यांना दिली. या धमकीनंतर त्यांच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. चाकणकर या कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी हा प्रकार चाकणकर यांना फोन करून सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी थेट सिंहगड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
मी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून पोलीस याबाबत तपास करत आहेत, असं चाकणकर म्हणाल्या. समाजात अशा विकृत व्यक्ती जन्माला येतात, त्यांना ठेचून काढलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा विकृतींना धडा शिकवला पाहिजे, असं सांगतानाच पोलीस योग्य तपास करतीय यावर माझा विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियातून अश्लील कमेंट्स
दरम्यान, याआधीही चाकणकर यांच्यावर सोशल मीडियाातून अश्लील कमेंट करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पुण्यातील सहा जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील कमेंट्स करत होते. चाकणकर यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. या टीकेचा राग मनात धरुन सहाजण चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शेरेबाजी करत असल्याचा आरोप आहे. (ncp leader rupali chakankar threat phone call)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 25 December 2020https://t.co/AwLQs7N6jl#Top9News #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स, पुण्यात सहा जणांवर गुन्हा
मुक्ताईनगरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, ग्रामपंचायत निवडणुकीत रक्षा खडसेंचं एकनाथ खडसेंना आव्हान
नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात
(ncp leader rupali chakankar threat phone call)