AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात

नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन येथे एका केटरर्सची निर्घृन हत्या करण्यात आली आहे.

नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात
| Updated on: Dec 26, 2020 | 8:22 AM
Share

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन येथे एका केटरर्सची निर्घृन हत्या करण्यात आली आहे. केटरिंगच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रात्रीच्या वेळी ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. (Caterers murder in Nagpur, police Arrested two Accused)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखिलेश मिश्रा नावाचा आचारी एका लग्न समारंभात स्वयंपाक करत होता. एका स्वयंपाक खोलीत त्याचं स्वयंपाकाचं काम सुरु होतं. त्याचवेळी आरोपींनी थेट स्वयंपाक खोलीत घुसून अखिलेशची हत्या केली तर आरोपींनी घातलेल्या हैदोसात 21 वर्षीय ओम मिश्रा गंभीर जखमी झाला आहे.

केटरिंगच्या पैशाच्या वादातून आरोपींनी केटरर्सची हत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या काही तासांत पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून दोघा-संशयित आरोपींनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस याप्रकरणी अधिक सखोल चौकशी करत आहेत.

नागपूर शहरात सातत्याने हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. अगदी काही दिवसांच्या अंतराने अशा गंभीर बातम्या येत आहेत. गुन्हेगारांचं दहशतीचं प्रमाण वाढत असल्याचं एकंदर चित्र आहे.

(Caterers murder in Nagpur, police Arrested two Accused)

(बातमी अपडेट होत आहे….) 

हे ही वाचा

भिगवणच्या भरवस्तीत अवैध वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून तरुणीसह महिलेची सुटका

आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली

लग्नाच्या चार दिवसांनी नवरी म्हणाली, मी तर पोळ्या लाटण्यासाठी आले होते; जबरदस्तीने लग्न लावलं!

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.