AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या चार दिवसांनी नवरी म्हणाली, मी तर पोळ्या लाटण्यासाठी आले होते; जबरदस्तीने लग्न लावलं!

समजा तुम्ही मुलगी बघायला गेलात... त्यानंतर तुमचं लग्न झालं... पण तुम्हाला दाखवलेल्या मुलीशी तुमचं लग्न झालं नसेल तर... (rajasthan: formula for executing the loot the bride for money was just 4 days jodhpur)

लग्नाच्या चार दिवसांनी नवरी म्हणाली, मी तर पोळ्या लाटण्यासाठी आले होते; जबरदस्तीने लग्न लावलं!
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 25, 2020 | 3:59 PM
Share

राजस्थान: समजा तुम्ही मुलगी बघायला गेलात… त्यानंतर तुमचं लग्न झालं… पण तुम्हाला दाखवलेल्या मुलीशी तुमचं लग्न झालं नसेल तर… आणि समजा जिच्याशी लग्न झालं ती मुलगी दाखवलेल्या मुलीची बहीण किंवा नातेवाईक नसून लग्नकार्यात पोळ्या लाटणारी (स्वयंपाक बनविणारी) असेल तर…? काय चक्रावलात ना? वाटते ना अस्सल फिल्मी कहाणी. पण ही फिल्मी कहाणी नसून खरीखुरी घटना आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाच्या बाबतीत हा किस्सा घडला असून त्यामुळे तो प्रचंड नैराश्यात आहे. (rajasthan: formula for executing the loot the bride for money was just 4 days jodhpur)

उम्मेद सिंह असं या तरुणाचं नाव आहे. 20 दिवसांपूर्वी उम्मेद सिंहच्या घरी गंगा सिंह नावाचे गृहस्थ स्थळ घेऊन आले होते. त्यांच्यासोबत जोधपूरच्या नागौरमधील काही लोक होते. त्यावेळी ‘आपल्या नात्यात एक मुलगी आहे. तिच्याशी तुमचं लग्न जुळवून देतो,’ असं गंगा सिंहने उम्मेद यांना सांगितलं. त्यानंतर उम्मेद सिंह त्यांचे मामा आणि भावासह मुलगी बघायला गेले. तिकडे गेल्यावर त्यांनी पिंकू कवरच्या हातावर 500 रुपये ठेवून लग्न पक्कं केलं. यावेळी गंगा सिंहने मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने लग्नाचा सर्व खर्च तुम्हालाच करावा लागेल. तसेच मुलीच्या वडिलांना साडे तीन लाख रुपये द्यावे लागतील, असं उम्मेद सिंह यांना सांगितलं.

वरात आली, वरात गेली

त्यानंतर 7 डिसेंबर रोजी उम्मेद सिंह नातेवाईकांसह लडकीच्या घरी नागौरला गेले आणि हे लग्न जुळवण्यात मध्यस्थी करणाऱ्या गंगा सिंह याच्याकडे दोन लाख रुपये दिले. त्यामुळे गंगा सिंहने उम्मेद यांना 11 डिसेंबर रोजी नागौरला वरात घेऊन यायला सांगितलं. पण या लग्नाची आणि साखरपुड्याची कुठेही वाच्यता न करण्याची विनंतीही केली. कारण लग्नाची बातमी फुटली तर गावातील लोक हे लग्न होऊ देणार नाही, असं त्यांनी उम्मेद यांना सांगितलं. त्यामुळे लग्न होत आहे तर कुणाला कशाला सांगा? असं म्हणून लग्न ठरल्याने हुरळून गेलेल्या उम्मेद यांनीही कुणालाही याची खबर लागू दिली नाही. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी ते वरात घेऊन नागौरला पोहोचला. तेव्हा गंगा सिंह यांनी थोडावेळ थांबा मुलीच्या घरात एकाचा मृत्यू झाला आहे, असं सांगत ही वरात स्वत:च्या गावी मांगलोदला नेली. मांगलोदला वरात आल्यावर गंगा सिंहने उरलेले एक लाख 50 हजार रुपये घेतले आणि त्यांचं लग्न लावून दिलं.

दाखवली एक, लग्न दुसरीशी

उम्मेद सिंह नवरीला घेऊन गावात आल्यावरच गावातल्या लोकांनाही त्यांचं लग्न झाल्याचं कळलं. उम्मेद सिंहच्या म्हणण्यानुसार मुलगी बघायला गेलो तेव्हा त्यांना दुसरी मुलगी दाखवण्यात आली होती. पण लग्न मात्र दुसऱ्याच मुलीशी लावून दिलं. दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं जात असतानाही केवळ लग्न होत असल्याने मी शांत राहिलो, असं उम्मेद सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

कहानी में ट्विटस्ट

लग्नाच्या दोन दिवसानंतर गंगा सिंह आला आणि तो नवरीला म्हणजे कांताला माहेरी घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा दोन दिवसानंतर तिला सासरी सोडलं. कांता जेव्हा सासरी आली तेव्हा उम्मेद सिंहने तिला मोबाईल भेट म्हणून दिला. 19 डिसेंबर रोजी त्याच मोबाईलवरून कांताने उम्मेद सिंहला फोन लावला आणि सारी हकीकत सांगितली. “गंगा सिंहने तुमची फसवणूक केली आहे. मला धमकावून लग्नाच्या मंडपात बसवून माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आता मला भिलवाड्याला त्यांनी सोडलं आहे. मी नागौरला सात दिवसासाठी लग्नांमध्ये स्वयंपाक बनवायला आले होते. 1 हजार रुपये रोजंदारीवर लग्नात पोळ्या लाटण्याचं काम करण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं. पण गंगा सिंहने मला धमकावून तुमच्याशी लग्न करायला लावलं. त्यामुळे मी जीवाच्या भीतीने तुमच्याशी लग्न केलं,” असं कांताने उम्मेद सिंहला सांगितलं. (rajasthan: formula for executing the loot the bride for money was just 4 days jodhpur)

पैसाही गेला बायकोही गेली

कांताने सर्व हकीकत सांगितल्यानंतर उम्मेद सिंह यांच्या पायाखालची वाळूच सरकली. या लग्नासाठी त्यांचे 10 लाख रुपये खर्च झाल्याने पैसाही गेला आणि बायकोही गेली, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आपली फसवणूक झाल्याचं कळल्याबरोबर त्यांनी थेट मतोडा पोलीस ठाण्यात जाऊन गंगा सिंहच्या विरोधात भादंवि कलम 420 आणि 406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. (rajasthan: formula for executing the loot the bride for money was just 4 days jodhpur)

संबंधित बातम्या:

अभिनेत्री सलमा आगा यांच्या कन्येला बलात्कार-हत्येची धमकी, महिलेला अटक

मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ

घोडबंदर रोडला 19 लाखांच्या दागिन्यांची चोरी, चोरटे मध्यप्रदेशात फरार, ठाणे पोलिसांचा अहोरोत्र तपास, अखेर सोने हस्तगत

(rajasthan: formula for executing the loot the bride for money was just 4 days jodhpur)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.