घोडबंदर रोडला 19 लाखांच्या दागिन्यांची चोरी, चोरटे मध्यप्रदेशात फरार, ठाणे पोलिसांचा अहोरोत्र तपास, अखेर सोने हस्तगत

पोलिसांनी बबलू सुमेरसिंग सिसोदिया नामक अट्टल चोरट्याच्या मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील घरातून चोरीस गेलेला 19 लाखांचा ऐवज हस्तगत केला (Thane police seize 19 lakh jewellery which stolen at Ghodbunder Road)

घोडबंदर रोडला 19 लाखांच्या दागिन्यांची चोरी, चोरटे मध्यप्रदेशात फरार, ठाणे पोलिसांचा अहोरोत्र तपास, अखेर सोने हस्तगत

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या अनिता ओमवीर सिंग यांचा मुलगा सचिन यांचा लग्न समारंभ जलसा लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभात फोटो काढत असताना अनिता सिंग यांनी खुर्चीवर ठेवलेली बॅग काही क्षणात चोरीला गेल्याची घटना 30 नोव्हेंबर 2020 रोजी घडली. चोरीला गेलेल्या बॅगेत 423 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. या घटने प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अहोरात्र तपास केल्यानंतर सोने मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, चोरटे अद्यापही फरार आहेत (Thane police seize 19 lakh jewellery which stolen at Ghodbunder Road).

दरम्यान, या घटनेत पोलिसांनी आरोपी बबलू सुमेरसिंग सिसोदिया नामक अट्टल चोरट्याच्या मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील घरातून चोरीस गेलेला 19 लाखांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड  यांनी दिली. या घटनेतील आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी तपास कसा केला?

ठाण्यात राहणाऱ्या अनिता ओमवीर सिंग यांचा मुलगा सचिन याचा 30 नोव्हेंबर रोजी जलसा लॉन येथे लग्न समारंभ आयोजित केलेला होता. यावेळी लग्न समारंभात फोटो काढत असताना अनिता सिंग यांनी खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची बॅग अज्ञात चोराने चोरून नेली होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला (Thane police seize 19 lakh jewellery which stolen at Ghodbunder Road).

पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू केला. या गुन्ह्याचा अहोरात्र तपास केल्यानंतर हा गुन्हा मध्यप्रदेश येथील राजगढ जिल्ह्यातील पचोर येथील अट्टल गुन्हेगार बबलू सुमेरसिंग सिसोदिया आणि त्याच्या दोन साथीदाराने केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

त्यानंतर कासारवडवली पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील गुलखोडी या ठिकाणी चोरांना पकडण्यासाठी आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. पण आरोपींना याचा सुगावा लागल्यामुळे ते पळून गेले. मात्र चोरीला गेलेले सगळे दागिने बबलूच्या घरी मिळून आल्याने पोलिसांनी ते हस्तगत केले. या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा : चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI