सहा वर्षांची मुलगी गायब, शेजारच्या तरुणाच्या घरातील कोपऱ्यात माती कशी? शहानिशासाठी खोदलं, चिमुकलीचा मृतदेह हाती, प्रचंड गदारोळ

बिहारच्या सुपौर जिल्ह्यातून प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने दारुच्या नशेत अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह घरात गाडला.

सहा वर्षांची मुलगी गायब, शेजारच्या तरुणाच्या घरातील कोपऱ्यात माती कशी? शहानिशासाठी खोदलं, चिमुकलीचा मृतदेह हाती, प्रचंड गदारोळ
प्रातिनिधिक फोटो

पाटणा : काही नराधम इतकं भयानक कृत्य करतात की त्या घटना ऐकल्यानंतर माणूस सुन्न होतो. त्यांच्या या विकृतीवर नेमका कशा पद्धतीने संताप व्यक्त करावा तेच कळत नाही. या नराधमांना खरंतर फाशीची शिक्षा व्हावी, असा विचार मनात येतो. कारण निष्पाप जीवाचा जीव घेण्याचा कुणालाही अधिकारी नाही. कोणतंही कारण असलं तरी हत्या त्यावरचा उपाय असूच शकत नाही. बिहारच्या सुपौर जिल्ह्यात तर एका विकृताने सहा वर्षाच्या चिमुकलीचा काही दोष नसताना हत्या केली. तो फक्त एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुलीचा मृतदेह स्वत:च्या घरात गाडला. त्याच्या या दुष्कृत्याचा अखेर भंडाफोड झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या सुपौर जिल्ह्यातून प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने दारुच्या नशेत अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह घरात गाडला. त्या चिमुकलीने आरोपीला तिच्या घरात चोरी करताना बघितलं होतं. त्यामुळे त्याने आपण पकडले जाऊ या भीतीने थेट चिमुकलीची निर्घूणपणे हत्या केली. संबंधित हत्येची घटना बुधवारी (8 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली.

मृतक सहा वर्षीय चिमुकलीचं नाव सानिया उर्फ आमना असं आहे. सानियाने आरोपी मोहम्मद राशिदला घरात चोरी करताना बघितलं होतं. सानियामुळे आपण अडचणीत येऊ या विचाराने आरोपीने सानियाची हत्या केली. सानिया घरासमोरुन जात असताना त्याने तिला पकडलं. त्यानंतर त्याने चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. नंतर घरात खड्डा खोदून जमिनीत पुरलं, असा आरोप पीडितेचे वडील मोहम्मद हसन यांनी केला आहे.

हत्येची घटना उघडकीस कशी आली?

मंगळवारी संध्याकाळ झाली तरी खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली सहा वर्षीय सानिया घरी आली नव्हती. त्यामुळे घरातल्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिचे कुटुंबिय तिच्या सर्व मैत्रिणींच्या घरी जावून विचारपूस करुन आले. खेळाच्या मैदानात, आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे चौकशी केली. पण सानिया सापडत नव्हती. सानियाने नुकतंच घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या घरात चोरी करताना पाहिलं होतं. तिने ते घरातील इतरांना सांगितलं होतं.

कुटुंबियांना आरोपीवर संशय

या दरम्यान सानिया आरोपीच्या घराबाहेरुन जात असताना त्याने तिचा हात पकडून तिला घरात नेलं. आरोपी नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपला गुन्हा लपविण्यासाठी स्वत:च्या घरात खड्डा खोदून तिचा मृतदेह गाडलं. दुसरीकडे सानियाच्या कुटुंबियांकडून तिची शोधाशोध सुरु होती. अखेर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सानियाचा शोध न लागल्याने तिच्या कुटुंबियांना शेजारच्या नराधमावर संशय आला. त्यांनी त्याच्या घरात शिरुन घराची झळती घेतली.

पोलिसांनी आरोपीला अखेर ताब्यात घेतलं

यावेळी घरातील एका कोपऱ्यात माती होती. सानियाच्या कुटुंबियांनी ती माती बाहेर काढली असता तिथे त्यांना सानियाचा मृतदेह आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्खळी दाखल होत पंचमाना केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

रात्रीस खेळ चाले, एकाच रात्री दोन ATM फोडले, नागरिकांना चोराची चाहूल, पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या, भयानक थरार

खाणीतल्या तळ्यात चिमुकल्या भावा-बहिणीसह त्यांच्या पित्याचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI