घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीवर अत्याचार, धक्कादायक घटनेने डोंबिवली हादरली !

डोंबिवलीत गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत नाही. विशेषतः महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. अशीच एक खळबळजनक घटना सध्या उघडकीस आली आहे.

घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीवर अत्याचार, धक्कादायक घटनेने डोंबिवली हादरली !
शेजाऱ्याकडून तरुणीवर अत्याचार
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 10, 2023 | 4:11 PM

कल्याण : घरी एकटी असल्याची संधी साधत शेजारी तरुणानेच एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सागर गाडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. कल्याण पूर्व भागातील पिसवली परिसरात ही घटना घडली आहे. घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ माजली आहे. पीडित तरुणी ही तिच्या बहिणीकडे राहते. तर आरोपी त्यांच्या शेजारी राहतो. मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीवर अत्याचार

काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहिण गावी गेली होती, तर बहिणीचा नवरा कामावर गेला होता. पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधत शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिची छेडछाड सुरु केली. यानंतर महिनाभरापूर्वी तिच्या बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरडा केल्याने तो पळून गेला. यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिच्या घरात घुसून आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तिने याबाबत बहिणीला सांगितले नाही.

मानपाडा पोलिसांकडून आरोपीला अटक

यानंतर पुन्हा आरोपीने भररस्त्यात तिची छेड काढली. यामुळे घाबरेलल्या पीडितेने याबाबत घरच्यांना सांगितले. पीडितेच्या बहिणीच्या पतीने याबाबत तरुणाला जाब विचारला असता त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागितली. मात्र काही दिवसांनी आरोपीने पुन्हा पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले. यानंतर पीडित कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी नराधम सागरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.