AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम नवलखांचे आयएसआय कनेक्शन, एनआयएचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

आरोपी गौतम नवलखा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने दहशतवादी कनेक्शन निदर्शनास आणून दिले आहे. शहरी नक्षलवादप्रकरणी सध्या नवी मुंबईतील घरात नजरकैदेत असलेले नवलखा यांचे पाकिस्तानी आयएसआयशी संबंध होते.

गौतम नवलखांचे आयएसआय कनेक्शन, एनआयएचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
गौतम नवलखाImage Credit source: social
| Updated on: Feb 22, 2023 | 10:04 AM
Share

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणातील आरोपी, मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचे पाकिस्तानातील ‘आयएसआय’ या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, असे एनआयएने म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासाला नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवलखा यांच्या जामीन अर्जाला एनआयएने तीव्र आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा, एकता व सार्वभौमत्वाला थेट धक्का

नवलखा यांचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वावर थेट परिणाम करणारे आहे, असे एनआयएच्या वतीने वकील संदेश पाटील यांनी सांगितले व नवलखांच्या जामीन अर्जाला विरोध केला. नवलखा यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत तपास यंत्रणेने न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर उत्तर दाखल केले. एनआयएच्या या दाव्याच्या पार्श्वभूमीवर नवलखा यांचा जामीन मिळण्याचा मार्ग आणखी खडतर बनण्याची शक्यता आहे.

प्रतिज्ञापत्रात नेमके काय म्हटले आहे?

आरोपी गौतम नवलखा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने दहशतवादी कनेक्शन निदर्शनास आणून दिले आहे. शहरी नक्षलवादप्रकरणी सध्या नवी मुंबईतील घरात नजरकैदेत असलेले नवलखा यांचे पाकिस्तानी आयएसआयशी संबंध होते. त्याचबरोबर बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेचेही ते सक्रिय सदस्य होते.

पुराव्यांनुसार नवलखांना शहरी भागात सरकारविरोधात विचारवंतांना एकत्र करण्याचे काम दिले होते. त्यासाठी नवलखा यांच्यावर सीपीआय माओवादी संघटनेच्या गनिमी कारवायांसाठी तरूणांची भरती करण्याची जबाबदारी सोपवली होती, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

नवलखा तीनदा गेले होते अमेरिकेला!

नवलखा हे गुलाम नबी फाई यांच्या नियमित संपर्कात होते. फाई यांनी आयोजित केलेल्या काश्मिरी अमेरिकन कौन्सिल कॉन्फरन्सला संबोधित करण्यासाठी त्यांनी तीनदा यूएसएला भेट दिली होती. फाई यांना जुलै 2011 रोजी आयएसआय व पाकिस्तान सरकारकडून निधी स्वीकारल्याबद्दल अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयने अटक केली होती. तेव्हा फाई यांच्याविरोधातील खटल्यादरम्यान नवलखा यांनी अमेरिकन न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून दयेची विनंती केली होती.

गुलाम नबी फाई यांनी करून दिला आयएसआयशी संपर्क

फाई यांनी नवलखांची आयएसआयच्या प्रमुखाशी ओळख करून दिली होती. त्यातूनच नवलखांचे आयएसआयशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे नवलखांनी काश्मीर फुटीरतावादी आणि माओवाद्यांच्या चळवळीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भाषणे दिल्याचा दावाही एनआयएने केला आहे.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन लेखक आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नवलखांना 28 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना सध्या नजरकैदेत ठेवले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.