AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांवरुन दोन शिक्षकांमध्ये वाद, पुढे वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले अन्…

शामराव देशमुख आणि धीरज हुंबे हे दोघेही उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात. तसेच दोघेही शहरातील कुरणेनगर परिसरात राहत होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण होती.

पैशांवरुन दोन शिक्षकांमध्ये वाद, पुढे वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले अन्...
उस्मानाबादमध्ये शिक्षकानेच शिक्षकाला संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 22, 2023 | 10:07 AM
Share

उस्मानाबाद / संतोष जाधव (प्रतिनिधी) : आर्थिक देवाण घेवाणीतून झालेल्या वादातून शामराव देशमुख आणि धीरज हुंबे हे दोघेही उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात. तसेच दोघेही शहरातील कुरणेनगर परिसरात राहत होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण होती. खळबळजनक घटना उस्मानाबादमध्ये उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्येच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शामराव देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे, तर धीरज हुंबे असे हत्या करणाऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

दोघेही एकाच शाळेत नोकरी करत होते

शामराव देशमुख आणि धीरज हुंबे हे दोघेही उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात. तसेच दोघेही शहरातील कुरणेनगर परिसरात राहत होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण होती. याच व्यवहारातून दोघांमध्ये वाद झाला. मग वाद विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत धीरज हुंबे याने डोक्यात दगड घालून शामराव देशमुख यांची हत्या केली.

पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक

घटनेची माहिती उस्मानाबाद शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसंनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी शिक्षकाला अटक करत त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. दोघा शिक्षकांमध्ये नेमका काय आर्थिक व्यवहार होता, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली