
नोएडातील निक्की हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. हुंड्यामुळे निक्कीच्या सासरच्यांनी छळ केला होता. तसेच तिच्या पतीने काही मित्रांसोबत मिळून तिला जीवंत जाळले. पोलिसांनी निक्कीला जिवंत जाळणाऱ्या, विपिन भाटीला चकमकीत गोळी मारली आहे. गोळी त्याच्या पायाला लागली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विपिनला या प्रकरणात वापरलेल्या ज्वलनशील पदार्थाच्या जप्तीसाठी नेले जात होते, तेव्हा त्याने एकाची पिस्तूल हिसकावली आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. विपिनच्या या एका चुकीमुळे आता त्याला कोणती शिक्षा होऊ शकते चला जाणून घेऊया…
पोलिसांनी विपिनचा पाठलाग केला असता त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळी झाडली. विपिनला गोळी लागली आणि त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर हे प्रकरण फक्त पत्नीला जाळण्यापुरते मर्यादित राहिले नाही. आता यात पोलिसांवर प्राणघातक हल्ला आणि पळून जाण्याचा प्रयत्न हे नवे आरोपही जोडले गेले आहेत. यापूर्वी पत्नीला जाळण्याचे प्रकरण सिद्ध झाले नसते तर कदाचित तो सुटला असता, पण आता पोलिसांवर गोळी झाडल्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागेल. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, त्याने आता केलेल्या चुकीमुळे त्याला आयुष्यभर तुरुंगातच काढावे लागेल.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
पत्नीला जाळण्याची शिक्षा किती?
पत्नीला जिवंत जाळून मारल्याच्या आरोपाखाली विपिनवर सर्वप्रथम BNS च्या कलम १०१ (खून) अंतर्गत कारवाई होईल. हे कलम सर्वात कठोर शिक्षेच्या तरतुदींपैकी एक आहे आणि यात फाशी किंवा आजीवन कारावास अशी शिक्षा होऊ शकते. जर हे सिद्ध झाले की खून हुंडा किंवा कौटुंबिक छळामुळे झाला, तर कलम ८० (हुंडा हत्या) लागू होईल, ज्याची शिक्षा किमान ७ वर्षे आणि कमाल आजीवन कारावास आहे. कलम ८५ (क्रूरता/पती किंवा सासरच्या मंडळींकडून छळ) देखील जोडले जाऊ शकते. याशिवाय, पुरावे नष्ट करण्याच्या किंवा लपवण्याच्या प्रयत्नात कलम २५८ (पुरावे नष्ट करणे) आणि जर कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग आढळला तर कलम ६१ (कट रचणे) लागू होईल.
पोलिसांवर गोळी झाडण्याचे प्रकरण
कलम १११ (खुनाचा प्रयत्न): पोलिस पथकावर जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडणे या कलमात येते. यात १० वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते.
कलम २२३ (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा कामात अडथळा): यात ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड.
कलम १८७ (नजरकैदेतून पलायन): पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यावर २ वर्षांपर्यंत तुरुंगवास.
आर्म्स अॅक्ट १९५९ चे कलम २७: बेकायदेशीरपणे शस्त्र चालवल्यावर वेगळी कठोर शिक्षा.
जर पोलिस कर्मचारी जखमी झाले असते, तर प्रकरण आणखी गंभीर होऊन कलम ११५ (गंभीर जखम पोहोचवण्याचा गुन्हा) पर्यंत वाढले असते.
शिक्षा काय होऊ शकते?
म्हणजेच, या सर्वांचा एकत्रित विचार केला तर हे प्रकरण अत्यंत गंभीर बनते आणि विपिनला आयुष्यभर तुरुंगात काढावे लागेल किंवा न्यायालय फाशीची शिक्षाही सुनावू शकते.
चकमकीने अडकवले
पोलिसांनी सांगितले आहे की, गोळी स्वसंरक्षणासाठी झाडली गेली. कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे की, जेव्हा आरोपी आधीच खुनासारख्या गुन्ह्यात अडकलेला असतो आणि पोलिसांवर गोळी झाडतो, तेव्हा चकमकीला न्यायालयात प्रत्युत्तर कारवाई मानणे सोपे होते. हे प्रकरण हेही दर्शवते की, गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असतानाही प्राणघातक घटना घडवू शकतात. जर विपिनचा मृत्यू झाला तर खटल्याची फाईल इथेच बंद होईल, पण जर तो जिवंत राहिला तर त्याच्याविरुद्ध खून आणि खुनाच्या प्रयत्नासारख्या कलमांखाली आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.