वापरलेले कंडोम आणि….रेल्वे कर्मचाऱ्याचा धक्कादायक साइड बिझनेस, छापा मारल्यानंतर अधिकारी हैराण
एका रेल्वे कर्मचाऱ्याने साइड बिझनेसचा जो मार्ग अवलंबला, त्याने सगळेच हैराण झाले आहेत. पोलिसांनी फ्लॅटवर छापा मारल्यानंतर तिथे जे मिळालं, ते पाहून पोलीसही हैराण झालेत. हे प्रकरण काय आहे?

रेल्वे कर्मचाऱ्याच्या फ्लॅटवर छापा मारल्यानंतर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य मिळालं आहे. कमल किशोर याला अटक करण्यात आली आहे. तो ग्रेड-2 चा रेल्वे कर्मचारी आहे. त्याच्या खोलीत शेकडोच्या संख्येने जुने मोबाईल, बॅट्री, टाळी, सीम कार्ड, मुलीचे केस, वापरलेले कंडोम आणि रेल्वे अपघाताशी संबंधित कटिंग मिळाली आहेत. आरोपी 500 रुपये आकारुन कपलला एकदिवसासाठी आपली रुम भाड्यावर द्यायचा. छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. भिलाईमधील पॉश कॉलोनी चौहान ग्रीन वॅलीमधील हे प्रकरण आहे रेल्वेत ग्रेड-2 चा कर्मचारी कमल किशोर नायकला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो फ्लॅटचा मालक आहे.
कमल किशोरने OLX आणि एका बनावट OYO वेबसाइटवर दिवसाचे 500 रुपये अशी फ्लॅट भाड्यावर देण्याची जाहीरात दिली होती. कॉलनीमधल्या लोकांना, सोसायटीत अनोळखी लोकं येऊ लागली, त्यावर संशय आला. एक युवक आणि युवती ग्राहक बनून फ्लॅटवर गेले. तिथे एक 16 वर्षांचा मुलगा होता. संशयास्पद हालचाली त्यांना आढळून आल्या. त्यानंतर कमल किशोरने युवक-युवतीला खोलीत बंद केलं. आतमध्ये बंद केलेल्या युवक-युवतीने गोंधळ घातल्यानंतर कॉलनीतले लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना बोलावलं.
प्रकरण थोडं रहस्यमयी
स्मृति नगर चौकी पोलिसांनी तात्काळ छापा मारुन कमल किशोरला ताब्यात घेतलं. फ्लॅटमध्ये पोलिसांना मिळालेल्या रजिस्टरमध्ये रेल्वे दुर्घटनेची कटिंग्स होती. त्यामुळे प्रकरण थोडं रहस्यमयी बनलं. बॉम्ब बनवण्याच साहित्य मिळालं. पोलीस प्रवक्ते पद्मश्री तंवर यांनी सांगितलं की, ‘जप्त केलेल्या साहित्याची फॉरेन्सिक तपासणी होईल’
