AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : आंतरराष्ट्रीय महिला दिनीच पुण्यात BMW कारमधील तरुणांचे रस्त्यावर अश्लील चाळे, VIDEO

Pune News : आता पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाच म्हणजे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. याच दिवशी ही घटना घडली.

Pune News : आंतरराष्ट्रीय महिला दिनीच पुण्यात BMW कारमधील तरुणांचे रस्त्यावर अश्लील चाळे, VIDEO
Pune CarImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 1:08 PM
Share

पुण्यात सध्या गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुण्यात घडणाऱ्या घटना पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर पुण्यात काय चाललय? असा प्रश्न पडतो. मागच्याच आठवड्यात पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला असाच अनुभव आला. तिने सिग्नलला टॅक्सी थांबल्यानंतर पळत जाऊन पोलीस ठाण गाठलं. आता पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाच म्हणजे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. याच दिवशी ही घटना घडली.

गाडीत बसलेला हा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हा आणि आतमधील त्याचा मित्र दोघेही दारू प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाने एका सिग्नलवर ही अश्लील हरकत केली. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. दोन्ही व्यक्ती BMW कारमध्य बसल्या होत्या. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.

पुण्यात मारहाणीची दुसरी घटना कुठे?

पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादावरून रिक्षाचालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्राने मारहाण. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. तरुणाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडिओ समोर. गाडी आडवी मारल्याच्या कारणावरुन अक्षय लोणकर नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय. ही मारहाण केल्याबद्दल सचिन मीसाळ आणि त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरुडमधील एम आय टी कॉलेजच्या समोर गाडी आडवी आणल्याच्या कारणावरुन ही भांडणं झालीत. पोलीसांनी सचीन मीसाळला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?