AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनला नवरदेवाला सेक्सची घाई झालेली, नवरी मुलगी त्याला फक्त एवढच म्हणाली की आपण…त्यानंतर जे घडलं सगळेच हादरले

नवरीच जोरदार स्वागत झालं. सर्व प्रथा, परंपरा, विधी झाल्यानंतर नवरा-नवरी दोघे बेडरुममध्ये गेले. बेडरुममध्ये नवरदेव जोशुआ नवरीच्या जवळ जाऊन बसला. हे अरेंज मॅरेज होतं. दोन्ही कुटुंब आनंदात होती.

हनीमूनला नवरदेवाला सेक्सची घाई झालेली, नवरी मुलगी त्याला फक्त एवढच म्हणाली की आपण...त्यानंतर जे घडलं  सगळेच हादरले
Tamilnadu Chennai Incident
| Updated on: Nov 27, 2025 | 12:56 PM
Share

नवरा-नवरीचं लग्न झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्व विधी पार पडून नवरी मुलीला सासरी आणलं. पण मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की, दोन्ही कुटुंबांचा आनंद क्षणात दु:खामध्ये बदलला. हनीमूनच्या रात्री नवरदेवाने नव्या नवरीकडे एक मागणी केली, तिने ती मान्य करण्यास नकार दिला. बस्स, एवढ्यावरुन पारा चढलेल्या नवरदेवाने हातोडीचे घाव घालून नवरी मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला. मूळापासून हादरवून सोडणारी ही घटना तामिळनाडूच्या चेन्नईमधील आहे. पुरासैवक्कम येथील पार्थसारथी स्ट्रीटवर राहणाऱ्या ऑगस्टीन जोशुआचं तिरुवल्लूर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय युवतीसोबत लग्न झालं. मॅट्रीमोनियल वेबसाइटवरुन हे लग्न झालेलं. 23 नोव्हेंबर 2025 रोजी हे लग्न झालेलं. लग्नानंतर नवरा नवरी मुलीला आपल्या घरी घेऊन आला. नवरीच जोरदार स्वागत झालं. सर्व प्रथा, परंपरा, विधी झाल्यानंतर नवरा-नवरी दोघे बेडरुममध्ये गेले.

बेडरुममध्ये नवरदेव जोशुआ नवरीच्या जवळ जाऊन बसला. हे अरेंज मॅरेज होतं. त्यामुळे नवरी मुलीची इच्छा होती की, पहिले एक-दोन दिवस दोघांनी फक्त एकमेकाशी बोलावं. संवाद वाढवावा. पण नवरदेवाला शारीरिक संबंध ठेवायचे होते. नवरी म्हणाली की, आपण आधी एकमेकाला समजून घेऊया. हे नवरदेव जोशुआला पटलं नाही. तो हट्टाला पेटला. नवरीने शरीरसंबंधांसाठी नकार दिला. त्यावेळी जोशुआ चिडून दुसऱ्या खोलीत निघून गेला.

नवरदेव जोशुआला हे पटलं नाही

जोशुआ दुसऱ्या खोलीतून हातोडा घेऊन आला. त्याने नवरीवर हातोड्याने अनेक वार केले. नवरी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तिथे कोसळली. नवरदेवाला वाटलं की, नवरीचा मृत्यू झालाय. म्हणून तो तिथून पळून गेला. सकाळी सासरच्या मंडळींना नवरी मुलगी खोलीत रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. तिला तात्काळ रुग्णालयात हलवलं.

लग्नाच्या रात्री तिला जोशुआच सत्य समजलं

जोशुआला हुंड्याविना लग्न करायचं होतं, म्हणून मी जोशुआसोबत लग्न केलं. पण लग्नाच्या रात्री तिला जोशुआच सत्य समजलं. जोशुआचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत असं नवरी मुलगी म्हणाली. आता नव्या नवरीने जोशुआ सोबत राहण्यास नकार दिला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.