धाराशिव / संतोष जाधव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा नोंद करुन एका आरोपीला अटक केली आहे. अजय चौरे असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या बीड जिल्ह्यातील केज येथील घरून 18 लाख रुपये जप्त केले. आरोपीला परंडा कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब आणि परंडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.