फक्त आंटींसोबतच मैत्री करायचा, नंतर असे फोटो मागवायचा; मोबाईलची गॅलरी उघडताच पोलीसही हैराण
एक अनोखा सायबर गुन्हा समोर आला आहे. एका आरोपीने ऑनलाइन विवाहित महिलांशी मैत्री करून त्यांच्या पायांचे फोटो मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये हजारो असे फोटो सापडले आहेत. हा आरोपी महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

आजकाल तुम्हाला अनेक सनकी आरोपी पाहायला मिळतील. इंटरनेटच्या जमान्यात तर या सनकी आरोपींचं जणू पेवच फुटलंय. हे सनकी आरोपी गुन्हे करतात, अशा पद्धतीने करतात की ते पाहून सर्वच हैराण होतात. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीने हे लोक गुन्हे करतात. पोलिसांनी एका अशाच आरोपीला पकडले. तो फक्त लग्न झालेल्या महिलांशीच मैत्री करायचा. त्यानंतर त्यांच्याकडून असे काही फोटो मागायचा की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याच्या मोबाईलची गॅलरी चेक केली, तेव्हा त्यांना एक दोन नव्हे तर एक हजार तसे फोटो सापडले. त्यामुळे पोलीसही अवाक् झाले.
हाथरस गेट येथे राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वनी सायबर सेलकडे एका व्यक्तीविरोधात तक्रार केली आहे. हा पुरुष ऑनलाइनवरून त्रास देत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. तो मला वारंवार मेसेज करून पायाचे फोटो मागायचा. मी जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने मला धमकावण्यास सुरुवात केली, असं या महिलेचं म्हणणं आहे. या महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केलेली असताना त्याचा मोबाईल चेक केला असता पोलीसही हैराण झाले.
ऑनलाइन मैत्री
ही महिला एका सैनिकाची पत्नी आहे. तिची एका व्यक्तीसोबत ऑनलाइन मैत्री झाली होती. सुरुवातीला त्याने तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. त्यामुळे या दोघांमध्ये पक्की मैत्री झाली. त्यानंतर त्याने या महिलेला तिच्या पायाचे फोटो मागितले. तिने जेव्हा त्याला फोटो पाठवण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे ही महिला घाबरली आणि तिने तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याची चौकशी केली. या आरोपीचं नाव दीपक शर्मा असं आहे. तो अलिगडच्या रुहेरी तिराहे येथील राहणारा असल्याचं चौकशीतून समोर आलं.
गॅलरीत खजाना
दीपक शर्मा हा विवाहित महिलांशी ऑनलाइन दोस्ती करायचा. त्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा. तो या महिलांच्या आवडत्या विषयावरच गप्पा मारायचा. त्यांना आपलसं करायचा आणि नंतर त्यांच्या पायाचे फोटो मागायचा. पोलिसांनी जेव्हा त्याचा मोबाईल चेक केला, तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये महिलांच्या पायाचे हजारो फोटो मिळाले. त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा आरोपी मनोरुग्ण असू शकतो. पोलीस त्याची अजून चौकशी करत आहेत.