पाकिस्तानी एन्फ्लुएन्सरसोबत भयंकर घडलं, घरात घुसून थेट…हादरवून टाकणारं कांड समोर!
पाकिस्तानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचा निर्घृण खून करण्यात आलाय.

Pakistan Sana Yusuf Murder Case : पाकिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कायमच चर्चेत असतो. इथे कधी कोणावर हल्ला होईल हे सांगता येत नाही. असे असतानाच आता एका 17 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलाय. या खुनामुळे पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. खून झालेल्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचे नाव सना युसूफ असे आहे.
घरात घुसून घातल्या गोळ्या
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हा निर्घृण खून झाला आहे. सना युसूफ ही अवघ्या 17 वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. याच गोळीबारात तिचा मृत्यू झालाय. हा प्रकार घडल्यानंतर सनाची आई फरजाना युसूफने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाकिस्तान दंड संहितेच्य कलम 302 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (2 जून) संबल पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली.
कोण होती सना युसूफ?
मिळालेल्या माहितीनुसार सना युसूफ पाकिस्तानी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होती. तिचे टिकटॉकवर साधारण आठ लाख तर इन्स्टाग्रामवर साधारण 5 लाख फॉलोअर्स होते. दाखल एफआयआरनुसार हल्लेखोर तरुण संध्याकाळी साधारण 5 वाजता तरुणीच्या घरात घुसला. त्याने हत्येचा उद्देश ठेवून सना युसूफवर थेट गोळीबार केला. यात दोन गोळ्या तिच्या पोटत घुसल्या. सना या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तातकडीने दाखल करण्यात आले. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
सना हल्लेखोराला ओळखत होती?
या खुनासंदर्भात आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार सना युसूफ आणि गोळ्या झाडणारा हल्लेखोर हे एकमेकांना ओळखत होते. हल्लेखो आणि सना यांच्यात संवाद झाला होता, असे सनाच्या काकूने सांगितले आहे. ‘तू इथून निघून जा. इथे चरही बजूने कॅमेरे आहेत. मी तुला पाणी आणून देते,’ असं सना हल्लेखोराला म्हणाली होती, असा दावा सनाच्या काकूने केला आहे.
दरम्यान, सनाच्या काकूने दिलेल्या या माहितीनंतर सनाच्या खुनासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणी आता नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
