
ल्हासा : काही लोकांना ट्रावेलिंग करण्याची फार आवड असते. प्रवास करताना अशा लोकांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. यामधील काही अनुभव हे वाईट तर काही खतरनाक असतात. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिला प्रवास करताना असा काही अनुभव आला आहे की तो त्याच्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. एकदम आलिशानमध्ये हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रूममधून त्याला उग्र वास येऊ लागला. मात्र हा वास नेमका कशाचा कोणाच्या लक्षात आलं नाही. योगायोग असा झाला की संबंधित प्रवासी रूममध्ये पडला त्याने जे काही पाहिलं त्याने त्याच्यासह सर्वांनाच धक्का बसला.
चीनचा रहिवासी असणाऱ्या झांग या व्यक्तिला फिरण्याची फार आवड होती. फिरायला गेल्यावर तो सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. ल्हासा या ठिकाणी तो गेला आणि तिथे एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. रूममधून त्याला काही वेळाने उग्र वास येऊ लागला. त्याला वाटलं की हा वास त्याच्या पायाचा येत असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळाने त्याच्या पायाचा वास जास्तच येऊ लागला.
जेवण करून तो बाहेर गेला आणि परत आल्यावर त्याला आणखी तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दुसरी खोली देण्यास सांगिती. दुसऱ्या खोलीत त्याला पाठवण्यात आलं आणि नंतर त्याची रूम साफ केली. हॉटेलवाल्यांनी त्याला सांगितलं की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे तुमच्या रूममध्ये जाऊ शकता. तो पुन्हा एकदा त्याला देण्यात आलेल्या रूममध्ये गेला आणि जात असताना ठेच लागली आणि तो खाली पडला.
खाली पडल्यावर तिन बेड खाली असं काही पाहिलं की त्याला धक्का बसला. कारण त्याला पलंगाखाली एक मृतदेह पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर घटनास्थळी येत डीएनए नमुने आणि उपस्थितांचे जबाब घेतले. झांग याने हा सर्व प्रकार आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला.