Pimpri Chinchwad: रस्त्याकडेला पोतं, 2 मानवी पाय अन्.. पिंपरी चिंचवडमध्ये भयावह दृश्य; परिसरात खळबळ
पोते उघडताच मानवी पाय असल्याचं समोर आलं. गुडघ्यापासून हे पाय वेगळे करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला दोन मानवी पायाचे अवयव आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलेल्या पोत्यामध्ये पुरुषाचे दोन पाय आढळून आले असून या धक्कादायक प्रकाराने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..
रस्त्याच्या कडेला पोत्यात पुरुषाचे पाय, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलेल्या पोत्यामध्ये पुरुषाचे दोन पाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करण्यासाठी आले असता त्यांना पोत्यावर रक्ताचे डाग दिसले.
सुरुवातीला श्वानाचे पाय असल्याचा संशय आला, मात्र पोते उघडताच मानवी पाय असल्याचं समोर आलं. गुडघ्यापासून हे पाय वेगळे करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हे पाय कुणाचे आहेत आणि यामागे नेमकं काय गूढ आहे? याचा तपास सुरू आहे.
जळगावमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाकडून तिघांना मारहाण!
दुसरीकडे, जळगावमध्ये पाळीव कुत्रा भुंकल्यावरून माजी नगरसेवक पुत्राकडून तिघांना मारहाण मारहाण करण्यात आली असून एकावर थेट चाकूने वार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बुलेटचा आवाज ऐकून पाळीव कूत्रा भूकंत मागे पळाल्याचा राग आल्याने माजी नगरसेवक पुत्राकडून मारहाण ही मारहाण करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक पुत्राने एका उद्योजकांसह त्याचा मुलगा, पत्नी, कार ड्रायव्हर अशा चौघांनाही मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे उद्योजकावर चाकूने देखील वार केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक पुत्र दारा पिरजादेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.