
गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्य एक धक्कादायक हत्याकांड घडलं. चारित्र्यावर संशय घेऊन सारखं भांडण करणाऱ्या पतीचा, त्याच्याच पत्नीने ओढणीने गळा आवळून खून केला होता. यामुळे संपूर्ण शहर हादरलं. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. अखेर दिवाळीच्या शेवटच्या दिवशी त्या दोघांमध्ये आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा गळा दाबला अशी माहिती समोर आली होती. नकुल भोईल असे मृत पतीचे नाव होते.
मात्र आता याच हत्याप्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आरोपी पत्नीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. सिद्धार्थ पवार अस अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मृत नकुल याची पत्नी चैताली हिचा प्रियकर आहे, चिंचवड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. -नकुल ची पत्नी आरोपी चैताली हिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्याने त्याला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
काय आहे प्रकरण ?
मृत नकुल भोईर हासामजिक कार्यकर्ता होता, तर त्याची पत्नी, चैताली ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नकुल चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा. गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी देखील याच मुद्यावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटला न मिटला तोपर्यंत रात्री पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आणि चैतालीने पती नकुलचा खून केला अशी माहिती समोर आली होती.
मात्र आता चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ याला पोलिसांनी अटक केली असून त्यामुळे बरीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. आरोपी सिद्धार्थ पवार आणि चैताली भोईर या दोघांमध्ये प्रेम संबंध होते . तर चैतालीचा पती नकुल या प्रेम संबंधात अडसर ठरत होता. एवढंच नव्हे तर चैतालीने घेतलेल्या कर्जाची माहिती नकुलला समजल्यावर त्यांचा वाद झाला. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ पवार समोरच नकुलने चैतालीला मारहाण केली. ते पाहून सिद्धार्थला राग अनावर झाला, त्यानंतर सिद्धार्थ आणि चैताली या दोघांनी संगनमतानेच नकुल भोईर याचा ओढणीच्या साह्याने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणात फक्त चैताली नव्हे तर तिचा प्रियकर सिद्धार्थ हाही आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.