AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी चालकाने आधी डिझेल भरलं, नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विचित्रप्रकार, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेमकं हेरलं आणि…

एसटी चालक नागेश धनवडे याला इस्लामपूर एमआयडीसी ते वाई एमआयडीसी येथे माल वाहतुकीच्या एसटीवर नेमले होते. चालक नागेश धनवडे याने इस्लामपूर आगारातील पेट्रोल पंपातून एसटीची डिझेलची टाकी पूर्ण भरुन घेतली होती.

एसटी चालकाने आधी डिझेल भरलं, नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विचित्रप्रकार, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेमकं हेरलं आणि...
एसटी चालकाने आधी डिझेल भरलं, नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विचित्रप्रकार, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेमकं हेरलं आणि...
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 09, 2021 | 4:08 PM
Share

सांगली : इस्लामापूर पोलिसांचं एक पथक रात्री गस्तीवर असताना तीन भामटे मालवाहू एसटीतील डिझेल चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शसान आलं. पोलिसांनी तीनही आरोपींना रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे एसटी चालक नागेश रुपचंद्र धनवडे हाच या प्रकरणातला मुख्य चोर असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा मित्र अमित धनवडे याला बेड्या ठोकल्या. तर त्यांचा मित्र आणि तिसरा सहकारी राजेंद्र धनवडे हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

आधी डिझेलची टाकी फुल भरली, नंतर चोरी

एसटी चालक नागेश धनवडे याला इस्लामपूर एमआयडीसी ते वाई एमआयडीसी येथे माल वाहतुकीच्या एसटीवर नेमले होते. चालक नागेश धनवडे याने इस्लामपूर आगारातील पेट्रोल पंपातून एसटीची डिझेलची टाकी पूर्ण भरुन घेतली होती. शनिवार (7 ऑगस्ट) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास इस्लामपूरहून मालवाहतूक करण्यासाठी एसटी घेवून निघाला. पेठनाका येथील वाघवाडीकडे जाणार्‍या सर्व्हिसरोडवर एसटी चालक नागेश धनवडे याने एसटी थांबवली. त्यावेळी त्याचे मित्र अमित धनवडे आणि राजेंद्र धनवडे हे हुंडाई कार घेऊन थांबले होते.

पोलिसांनी आरोपींना पकडलं

आरोपी एसटीतील डिझेल एका पाईपने कारमध्ये ठेवलेल्या कॅनमध्ये काढत होते. दरम्यान इस्लामपूर पोलीस ठाण्याचे रात्रगस्ती पथक त्या मार्गावरुन जात होते. यावेळी पोलिसांनी एसटी थांबल्याचे पाहिले. पोलिसांनी पाहणी केली असता एसटीतून डिझेल चोरी सुरु असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी चालक नागेश धनवडे आणि अमित धनवडे यांना ताब्यात घेतले. या दरम्यान राजेंद्र धनवडे हा घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला.

चोरट्यांनी 60 लिटर पेट्रोल चोरलं

एसटीच्या डिझेल टाकीत 190 लिटर डिझेल होते. यापैकी चोरट्यांनी 5427 रुपयांचे 60 लिटर डिझेल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एसटी, हुंडाई कार, डिझेलचे कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबतची फिर्याद इस्लामपूर आगाराच्या सहायक वाहतूक अधिक्षक सुनंदा देसाई यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

अश्लील वर्तनाचा तिटकारा, नागपुरात तरुणाकडून मित्राची हत्या

तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे, युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरचा इशारा

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट