AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 बाईक शोधायला गेले आणि हाती घबाड लागलं… पोलिसांनी अशा आवळल्या बाईक चोरांच्या मुसक्या !

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी बाईक चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या काही तासांतच उकल केली आणि बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. एका बाईकचा शोध घेता-घेता त्यांना चोरी झालेल्या तब्बल ....

1 बाईक शोधायला गेले आणि हाती घबाड लागलं... पोलिसांनी अशा आवळल्या बाईक चोरांच्या मुसक्या !
| Edited By: | Updated on: Sep 12, 2023 | 2:42 PM
Share

Crime News : राज्यातील चोरी, गुन्ह्यांच्या घटनांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातही पोलिसांना एक बाईक चोरी (bike theft) झाल्याची सूचना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि बाईक चोरी करणाऱ्या टोळीलाच त्यांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 17 बाईक्स जप्त केल्या असून तीन आरोपींना अटक (3 arrested) करण्यातही त्यांना यश मिळालं आहे. राजुरा पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

खरंतर ७ सप्टेंबर रोजी राजुरा ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरूणाने पोलिसांत जाऊन बाईक चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. प्रॅक्टिससाठी तो शाळेत गेला असताना, त्याने बाईक बाहेर पार्क केली होती. मात्र परत आल्यानंतर बाईक तेथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने पोलिस स्थानकात चोरीची तक्रार नोंदवली.

बाईक चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

यानंतर राजुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार केली आणि अवघ्या २४ तासांच्या आतच राजुरा उपविभागात वाहन चोरी करणाऱ्या टोळीला पकडले. त्यांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 17 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गर्दी असलेल्या विशिष्ट ठिकाणी टेहळणी करून ते वाहनावर लक्ष ठेवायचे आणि संधी मिळताच बाईक चोरायचे. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या बाईक्स ते दुसरीकडे नेऊन विकायचे, असेही आरोपींनी सांगितले.पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.