अमरावतीत पोलीस उपनिरिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, विभागात खळबळ

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अनिल मुळे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

अमरावतीत पोलीस उपनिरिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, विभागात खळबळ


अमरावती : अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अनिल मुळे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या आत्महत्येनं गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरात दोन हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच पोलीस अधिकारी PSI अनिल मुळे यांनी आत्महत्या केली. यामुळे शहर हादरून गेलं आहे. अनिल मुळे हे पोलीस अधिकारी कटोरा नाका, रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून जवळ गोल्डन लिफ मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालया समोरील लेआऊटमधल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन यात्रा संपविली.

आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात, दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे, तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते.

हेही वाचा :

तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना

जन्मदात्या वडील आणि भावानेच तरुणीला फासावर लटकवलं, कारण…

मनाच्या आडोशाची जागा नैराश्याच्या गर्तेत, मिरजेत 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं, कारण…

व्हिडीओ पाहा :

Police sub inspector of Frejarpura suicide by hanging on tree in Amravati

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI