जन्मदात्या वडील आणि भावानेच तरुणीला फासावर लटकवलं, कारण…

मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणीची तिच्याच वडील आणि भावाने हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

जन्मदात्या वडील आणि भावानेच तरुणीला फासावर लटकवलं, कारण...
प्रातिनिधिक फोटो

भोपाळ : मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणीची तिच्याच वडील आणि भावाने हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कुटुंबियांनी आधी तरुणीची हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्यासाठी तिचा मृतदेह साडीच्या आधाराने सिलिंगला लटकवला. पण जेव्हा खरं समोर आलं तेव्हा संपूर्ण मध्यप्रदेश राज्य हादरलं.

खरं कसं उघड झालं?

पीडितेच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पीडितेचे कुटुंबिय जी माहिती सांगत होते त्यावर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा निरखून पंचनामा केला. यावेळी गळफास घेतलेल्या साडीला फासाची गाठ ही बाहेरुन बसलेली दिसली.

तसेच मुलीचा मृतदेह बऱ्याच उंच ठिकाणी होता. तिथे तिला पोहोचणं अवघड होतं, असं पोलिसांना जाणवलं. अखेर पोलिसांनी पीडितेचे वडील राजेंद्र राठोड आणि भाऊ जितेंद्र राठोड दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृतक तरुणीच्या वडील आणि भावाने आपला गुन्हा कबूल केला. संबंधित घटनेमागील कारण उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मुलीची हत्या करण्यामागील नेमकं कारण काय?

खरंतर आरोपींनी मुलीची हत्या करण्यामागील कारण हे सैराट चित्रपटासारखंच आहे. पीडिता हिचं दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम होतं. त्यातूनच ती घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळून गेला होती. तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. अखेर पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. पण तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर सूड उगवला.

मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने आपली समाजात नाचक्की झाली. याच विचारातून मुलीच्या वडील आणि भावाने रागाच्या भरात मुलीची हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या केली, असा बनाव रचला. तसेच क्राईमवर आधारित सीरिअल बघून आपण हा कट रचला, असंही आरोपींनी आपल्या कबुली जबाबात म्हटलं.

हेही वाचा :

लाचखोरी प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?

Published On - 11:35 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI