AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?

नागपुरातील गुन्हेगार कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज (11 ऑगस्ट) अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वकर्मा नगर येथे सशस्त्र हल्ल्याची घटना घडली.

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?
AJANI POLICE
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 9:06 PM
Share

नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज (11 ऑगस्ट) अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वकर्मा नगर येथे सशस्त्र हल्ल्याची घटना घडली. पाच आरोपींनी दोघांवर शस्त्रांनी हल्ला केला. यात दोघेही गंभीर झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Two people critically injured in attack of Five men all accused arrested by Nagpur police)

आरोपी आणि जखमींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद  

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी घटना घडली. या परिसरात पाच जणांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आरोपी आणि जखमी यांच्यात जुनी ओळखी आहे. दोन दिवसांपूर्वी काही कारणांमुळे आरोपी आणि जखमींमध्ये वाद झाला होता. आज दुपारी हा वाद पुन्हा चिघळला. त्यानंतर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यामुळे एका गटातील पाच जणांनी दुसऱ्या गटातील दोघांवर सशस्त्र हल्ला केला.

शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप

हा हल्ला भीषण असल्यामळे यात दोघे जंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा प्रकारचे गुन्हे रोजच घडत आहेत. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप केला आहे.

मुंबईत बलात्काराच्या आरोपाखाली भोंदूबाबाला अटक 

पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार करणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबई पोलिसांनी आज (11 ऑगस्ट) बेड्या ठोकल्या आहेत. गोड बोलण्यात फसवून भोंदूबाबाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप गेल्या दहा वर्षांपासून त्याची भक्त असलेल्या महिलेनेच केला आहे. मुंबईतील कांदिवली पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. यामुळे आरोपी बाबाच्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पूजापाठ आणि देवाच्या नावाखाली भक्तांना जाळ्यात अडकवून भोंदूबाबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या भोंदूबाबाकडे सेवा करणाऱ्या एका महिला भक्ताने कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

इतर बातम्या :

लाचखोरी प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित

सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक

अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली, महिलेला अटक

(Two people critically injured in attack of Five men all accused arrested by Nagpur police)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ