सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक

गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्य प्रदेशातील एका इसमाने फेसबुकवर मैत्री केली. आधी लैंगिक शोषण करत नंतर त्याने महिलेशी लग्न केलं. तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत पळ काढला.

सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक
गोंदियात महिलेची फसवणूक, आरोपीला पुण्यात अटक

गोंदिया : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तिशी मैत्री करणं गोंदियातील महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. विधवा महिलेशी मंदिरात लग्नाचं ढोंग रचून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोन लाख रुपयांची लूट करत तरुणाने पोबारा केला. आर्थिक फसवणुकीसोबतच आपलं लैंगिक शोषण झाल्याची तक्रार महिलेने नोदवली.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्य प्रदेशातील एका इसमाने फेसबुकवर मैत्री केली. आधी लैंगिक शोषण करत नंतर त्याने महिलेशी लग्न केलं. तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच 39 वर्षीय आरोपी दिलीप यादव याला गोंदिया पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशाच्या खंडोबा गावात राहणाऱ्या 39 वर्षीय दिलीप यादव या इसमाने कोरोना काळात गोंदिया शहरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. सोबतच दिलीप यादव या इसमाने गोंदियात येत 27 जुलै 2020 ते 1 जून 2021 या काळात गोंदियातील विविध हॉटेल-लॉज अशा ठिकाणी नेत तिच्याशी शारीरिक सबंध देखील प्रस्थपित केले होते.

वैधव्याचा फायदा घेत लग्नाच्या भूलथापा

पीडित महिला ही विधवा असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. आपल्या आधीच्या पत्नीला मी कंटाळलो आहे. मी तिला घटस्फोट दिला असल्याचं खोटं सांगत पीडितेशी गोंदियाच्या गायत्री मंदिरात त्याने लग्न देखील केले. काही दिवस तो तिच्यासोबत गोंदियात नवऱ्यासारखा राहिला.

आरोपीला पुण्यातून अटक

तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत त्याने पुण्याला पळ काढला. दिलीप बरेच दिवस परत न आल्याने पीडितेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने गोंदिया शहर पोलीस ठाणे गाठत आरोपी दिलीप यादव याच्या विरुद्ध फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दिलीप यादव याला पुण्यातून अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI