AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल, बीडच राजकारण पुन्हा तापलं

Dhananjay Munde : संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडच राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. बीड शहरातील खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झालीय. आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केले आहेत.

Dhananjay Munde : विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो  व्हायरल, बीडच राजकारण पुन्हा तापलं
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2025 | 2:02 PM
Share

“बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे” असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले. “याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केले आहेत. परंतु आरोप करणे सोपे आहे ते सिद्ध होणे गरजेचे आहे‌” अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीड मधील राजकारण तापले असून आमदार धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावले. “सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत” असे देखील म्हटले आहे.

“संतोष देशमुख खून प्रकरणात जे बोलत होते, ते विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात गप्प का आहेत? त्यांना लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना आज खासदार बजरंग सोनवणे यांनी “आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो होतो. मात्र जे चार दिवसांनी बोलले, त्यांनाच लाज वाटली की नाही हे मला कळालं”

धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

बीड शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रात्री आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली‌ आणि आज मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. पत्रकार परिषदेनंतर आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...