एक चुक साडेसात लाख रुपयांना नडली, निष्काळजीपणा म्हणणार आणखी दुसरं काही? घटना ऐकून पोलीसही चक्रावले

विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार घडवून गेल्यानंतर काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एक चुक साडेसात लाख रुपयांना नडली, निष्काळजीपणा म्हणणार आणखी दुसरं काही? घटना ऐकून पोलीसही चक्रावले
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 8:43 AM

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या एका तक्रारीवरून पोलीसही चक्रावून गेले आहे. तक्रारदार महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला आपल्या घरातील जून कपाट विक्री करायचे होते, त्यासाठी महिलेने गृहउपयोगी वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या साईटवर जाहिरात केली होती. त्यामध्ये एकाणे कपाट खरेदी करण्याचा बहाणा करून मोबाइलवर संपर्क साधला. त्यामध्ये बोलणं झाल्याप्रमाणे समोरील व्यक्तीने व्यवहार केल्याचे सांगितले, मात्र चुकून आठ लाख रुपये तुमच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. यामध्ये विशेष बाब म्हणजे महिलेला खात्री पटावी यासाठी त्याने बनावट स्क्रीनशॉट पाठवून विश्वास संपादन केला. महिलेने याबाबत कुठलीही शहानिशा न करता थेट समोरील व्यक्तीच्या अकाऊंटवर कपाटाची रक्कम कमी करून घेत उर्वरित 7 लाख 65 हजार रुपये ट्रान्सपर केले आहे.

आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात येताच तीने हडपसर पोलीस ठाण्यात धावून घेऊन याबाबत माहिती देत तक्रार दिली आहे.

यामध्ये फेक स्क्रीनशॉटच्या मदतीने सायबर भामटयानी महिलेला जवळपास साडेसात लाख रुपयांना चुना लावला आहे.

हे सुद्धा वाचा

फसवणूक केलेल्या नंबर नुसार या प्रकरणातील आरोपी आदिल शेख याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार घडवून गेल्यानंतर काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या निदर्शनास आली होती.

हसपसर पोलीस ठाण्यातील पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करीत असून महिलेचे बँक खाते तपासले असता असे कुठलेही चुकून पैसे आले नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे काही क्षणातच फेक स्क्रीन शॉटसच्या मदतीने महिलेला ऑनलाईन गंडा घातला गेला असून महिलेनेही शहानिशा न करता लाखों रुपये पाठवून दिल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणे पोलीसांच्या सायबर पोलीसांच्या वतिने या गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे, येत्या काळात या गुन्ह्यात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.