
Ayush Komkar Murder Case : पुण्यात आयुष कोमकर या तरुणाचा 5 सप्टेंबर रोजी खून झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेमागे टोळीयुद्ध असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सोबतच माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी आयुषचा गोळ्या घालून संपल्याचेही सांगितले जात आहे. दम्यान, आता याच सनसणाटी खून प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे. आता पोलिसांनी आंदेकर कुटुंबाभोवती आपला फास आवळला असून या प्रकरणात आता याच कुटुंबातील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे आता आयुष कोमकरच्या (Ayush Komkar Murder) हत्येतमागे महिलांचाही समावेश आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी आंदेकर कुटुंबियांवरचा फास आणखी आवळला आहे. पोलिसांनी वर्षभरापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना तब्यात घेतले आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सोनाली आंदेकर यांचादेखील सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासह पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेला कृष्णा आंदेकर याची पत्नी प्रियांका आंदेकर यांनाही ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी सोनाली आंदेकर आणि प्रियांका आंदेकर या दोघींनाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करण्याची शक्यता आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात या दोघींचाही संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोघींचीही चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात बरेच आरोपी समोर आले आहेत. मात्र आता पोलिसांनी पहिल्याच दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आयुष कोमकरच्या हत्येमागचा मास्टरमाईंड नेमका कोण आहे? याचाही छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ :