AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vanraj Aandekar Murder : आधी लाईट घालवले, बाईकवरून मारेकरी धडाधड उतरले, अन् बेछूट गोळीबार… वनराज आंदेकर यांच्या हत्येपूर्वी काय-काय घडलं ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे पुण्यात प्रचंड खळबळ माजली असून 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या हत्येपूर्वी काय घडलं, मारेकऱ्यांनी कसा डाव साधला ?

Vanraj Aandekar Murder : आधी लाईट घालवले, बाईकवरून मारेकरी धडाधड उतरले,  अन् बेछूट गोळीबार... वनराज आंदेकर यांच्या हत्येपूर्वी काय-काय घडलं ?
वनराज खांदेकरच्या हत्येचा व्हिडीओ समोर
| Updated on: Sep 02, 2024 | 12:23 PM
Share

विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र मोठ्या हत्याकांडाने हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वनराज आंदेकर यांची पुण्यात निर्घृण हत्या झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. भर चौकात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. एवढंच नव्हे तर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्यानेही सपासप वार केले. यामुळे पुण्यात मोठी दहशत माजली असून पोलिसांनी याप्रकरणी 3 संशयित आरोपींना अटकही केली आहे. याचदरम्यान या हत्याकांडाचा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ समोर आला असून ही हत्या नेमकी कशी झाली, तेव्हा तिकडे काय घडलं, कोण-कोण उपस्थित होतं याचा खळबळजनक तपशीलही समोर आला आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना नाना पेठ भागात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज हे रविवारी रात्री 8.30 सुमारास तेथे उभे असताना अचानक बाईकवरून काही हल्लेखोर आले आणि त्यांनी वनराज यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांनी वनराज यांच्यावर पाच राऊंड फायर केले. एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावरही हल्लेखोर थांबले नाहीत,त्यांनी वनराज यांच्या शरीरावर कोयत्यानेही सपासप वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले, ते पाहून आरोपींनी तेथून लागलीच पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हल्लेखोरांनी धडाधड मारल्या गोळ्या

या घटनेनंतर नाना पेठ परिसरात अतिशय दहशतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील डोके तालीम येथील ही घटना आहे. ही वर्दळीची जागा आहे. पण काल हल्ल्यापूर्वीच या भागातील वीज घालवून अंधार करण्यात आला. सीसीटीव्हीमध्ये ते दिसून आलं. त्यानंतर आंदेकर उभे होते तेथे 5-6 बाईक्सवर बसून 12-13 हल्लेखोर आले, गाडीवरून पटापट उड्या मारून त्यांनी आंदेकरांवर नेम धरून बंदूकीतन सटासट गोळ्या झाडल्या.

त्यांना पाहून आंदेकर व त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या एकाने पळ काढण्याचाही प्रयत्न केला. पण एका हल्लेखोराने त्यांचा टीशर्ट पकडून त्यांना ओढलं आणि गोळ्या चालवल्या, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही सपासप वार केले. काही क्षणांतच हल्लेखोर बाहेर पडले, एक-दोघांच्या हातात कोयता तळपत होता.पटापट ते बाईक्सवर बसले आणि पुढच्याच क्षणी त्यांनी घटनास्थळवारून पळ काढला.

आंदेकर कुटुंबाचा राजकारणात दबदबा

पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते.

घरगुती कारणामुळे हत्या ?

वनराज आंदेकर यांची हत्या करणारा संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. हत्येमागचे नेमके कारण काय, त्यात कोण-कोण सामील आहे, या सर्व गोष्टींचा पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती समोर येऊ शकते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.