Pune Crime : ऐकावं ते नवलच… पुण्यातला ‘हा’ पठ्ठ्या फक्त पांढऱ्या गाड्या चोरायचा, सापळा रचत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हा आरोपी पार्किंगमधून नवीन गाड्या चोरायचा. मात्र या गाड्या तो विकत नसे तर फक्त फिरवायचा आणि त्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार होत असे.

Pune Crime : ऐकावं ते नवलच... पुण्यातला 'हा' पठ्ठ्या फक्त पांढऱ्या गाड्या चोरायचा, सापळा रचत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातला 'हा' पठ्ठ्या फक्त पांढऱ्या गाड्या चोरायचाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:08 PM

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : कोणाला कधी कसली आवड लागेल हे काही सांगता येत नाही. पुण्यातल्या एका पठ्याला चक्क पांढऱ्या रंगाच्या मोपेड (Moped) गाड्या चोरायची आवड लागली होती. ही आवड गेल्या अनेक दिवसांपासून तो जोपासत देखील होता. परंतु आता चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या पठ्ठ्याने आतापर्यंत सात पांढऱ्या रंगा (White Colour)च्या गाड्या चोरी (Stole) केल्या आहेत. विवेक वाल्मिक गायकवाड (20, रा. थेरगांव) असं सदर आरोपीचं नाव असून, त्याला नव नवीन गाड्या फिरवण्याचा शॉक होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. चतु:श्रृंगी पोलिसांनी सापळा रचून या चोराला अटक केले असून, त्याची रवानगी आता येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे.

गाड्या फिरवायचा आणि पेट्रोस संपले की जागेवरच ठेवून द्यायचा

हा आरोपी पार्किंगमधून नवीन गाड्या चोरायचा. मात्र या गाड्या तो विकत नसे तर फक्त फिरवायचा आणि त्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार होत असे. त्याने चतु:श्रृंगी, वाकड, सांगवी या भागातून या दुचाकी चोरी केल्या आहेत. शहरात अलीकडे गाड्या चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यातच या एकाच आरोपीवर तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी सापळा रचत एका सोसायटीवर आपले लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच सोसायटीत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग हे दुसऱ्या पार्किंगमध्ये थांबलेले असतानाच आरोपी विवेक हा नव्या गाड्यांना चाव्या लावून पाहत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत विवेकने आतापर्यंत सात गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालं आहे. (A thief who stole white mopeds in Pune was arrested by the police)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.