मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेले होते, लोणावळ्यात पुन्हा स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

जुना खंडाळा येथील एका खाजगी बंगल्यात मयत निखिल निकम आणि त्याचे काही मित्र एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र ही पार्टी एका तरुणाला महागात पडली.

मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेले होते, लोणावळ्यात पुन्हा स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडाली
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 04, 2023 | 6:12 PM

पुणे : लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू होण्याची घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या एका तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. निखिल निकम असे मयत तरुणाचे नाव आहे. जुना खंडाळा भागातील एका खाजगी बंगल्यात ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मित्राचा वाढदिवस साजरा करायला सर्व मित्र आले होते

जुना खंडाळा येथील एका खाजगी बंगल्यात मयत निखिल निकम आणि त्याचे काही मित्र एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र ही पार्टी एका तरुणाला महागात पडली.

मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंग पूलमध्ये बुडाला

वाढदिवसाची पार्टी करायला आलेल्या निखिलचा मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंग पूलमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे स्विमिंग पूल आणि तेथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आयटी कंपनीत कामाला होता निखिल

मयत निखिल निकम हा पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथील रहिवासी होता. तसेच तो उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत नोकरी करत होता. मंगळवारी तो इतर 11 मित्रांसोबत लोणावळ्यात एका बंगल्यात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पिकनिकला गेला होता.

बर्थ डे पार्टीदरम्यान सर्व मित्र दारु प्यायले होते. दारुच्या नशेत निखिल स्विमिंग पूलजवळ आला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.