अभ्यास सोडून उशिरापर्यंत झोपायची मुलगी, आई ओरडली म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

लखनौमधील जानकीपुरम परिसरात आकाश सिंह हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. आकाश सिंह हे आयटीबीपीमध्ये निरीक्षक आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सिंह हे ड्युटीवर गेले होते. घरी पत्नी आणि मुलं होती.

अभ्यास सोडून उशिरापर्यंत झोपायची मुलगी, आई ओरडली म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 4:50 PM

लखनौ : अभ्यासावरुन आई ओरडली म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनौ येथे घडली आहे. क्षुल्लक कारणातून मुलीने घेतलेल्या या टोकाचे निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लखनौमधील जानकीपुरम परिसरात आकाश सिंह हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. आकाश सिंह हे आयटीबीपीमध्ये निरीक्षक आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सिंह हे ड्युटीवर गेले होते. घरी पत्नी आणि मुलं होती. सिंह यांची मुलगी सध्या बारावीत शिकत आहेत.

परिक्षेचा अभ्यास करायला सांगितले म्हणून नाराज झाली मुलगी

बारावीची परीक्षा जवळ आली आहे. यामुळे उशिरापर्यंत झोपते, अभ्यास करत नाही. जाऊन परिक्षेचा अभ्यास कर, असे म्हणत आई मुलीला ओरडली. आई ओरडल्यामुळे मुलगी नाराज झाली आणि आपल्या खोलीत निघून गेली.

हे सुद्धा वाचा

खोलीत जाऊन मुलीने आत्महत्या केली

मुलीने खोलीचा दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. बराच वेळ झाला तरी मुलगी दरवाजा बंद करुन आतच होती. आईने तिला आवाज दिला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे आईला संशय आला.

दरवाजा उघडून पाहिले असता आईच्या पायाखालची जमीनच सरकली

आईने शेजाऱ्यांना बोलावून खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीत मुलगी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.