पुणे सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, पाच जण जखमी

सारोळे गावाजवळ येताच बसचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजाक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकवर जाऊन धडकली.

पुणे सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, पाच जण जखमी
पुणे सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघातImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 9:47 PM

विनय जगताप, TV9 मराठी, पुणे : पुणे-सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात (Luxury Bus Accident) होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. टायर फुटल्यानं (Tire burst) नियंत्रण सुटून बस दुभाजाक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकला धडकली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र 5 जण जखमी (Five Injured) झाले असून, एक जण गंभीर जखमी आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावाजवळ ही घटना घडली.

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात होती लक्झरी बस

सदर लक्झरी बस साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत होती. सारोळे गावाजवळ येताच बसचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजाक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकवर जाऊन धडकली. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कुरिअर कंपनीच्या ट्रकला धडकली बस

रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या मालवाहतूक करणाऱ्या NTC लॉजिस्टिक्स कुरिअर कंपनीच्या ट्रकला बस समोरून धडकली. सोरोळे गाव हद्दीमध्ये इंडियन पेट्रोल पंप जवळच ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

अपघातातील सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अधिक तपास किकवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

पिंपळगाव बसवंतमध्ये उभ्या ट्रकच्या शॉर्ट सर्किटमुळे आग

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पिंपळगाव बसवंत शहरकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या उभ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. क्षणातच ट्रकने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला.

स्थानिकांनी घटनास्थळावरून तातडीने याबाबत अग्निशमन विभागास आग लागल्याची माहिती दिली. पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीत ट्रकच्या कबिनचे आतील बाजूचे पूर्ण नुकसान झाले आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.