महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चिमुकल्यांचा करुण अंत, वाचा नेमके काय घडले?

गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेला.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चिमुकल्यांचा करुण अंत, वाचा नेमके काय घडले?
अहमदनगरमध्ये वीजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 9:02 PM

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : वीजवाहक तारेचा धक्का बसून एकाच चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू (Four Children Death by Electric Shock) झाल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka Ahmednagar) खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येणाऱ्या वांदरकडा येथे आज घडली आहे. या घटनेमुळे बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर वीजवाहक तार गेल्या चार दिवसांपासून तुटली आहे. मात्र महावितरण याकडे वेळीच लक्ष न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार (Mismanagement of Mahavitaran) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मोलमजुरी करुन बर्डे कुटुंबीय उदरनिर्वाह करत होते

वांदरकडा परिसरात अजित बर्डे आणि अरुण बर्डे हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह राहतात. बर्डे कुटुंबीय मोलमजुरी करुन आपले उदरनिर्वाह चावलतात. दोन्ही अजित बर्डे यांना 8 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असे दोन मुलगे होते, तर अरुण बर्डे यांना 12 वर्षे आणि 10 वर्षाचे दोन मुलगे होते.

शाळा सुटल्यानंतर खेळायला गेली होती मुले

शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ही चारही मुलं घराजवळ खेळत होती. जवळच असलेल्या नाल्याजवळ मुले खेळत होती. खेळता असतानाच नाल्याजवळ असलेल्या वीजवाहक तारेचा मुलांना धक्का लागला आणि तारही मुले जागीच ठार झाली.

हे सुद्धा वाचा

आजीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला

यावेळी तेथेच आसपास शेळ्या चारत असलेली मुलांची आजी अलकाबाई बर्डे हिच्या ही बाब लक्षात आली. यानंतर अलकाबाईने जोरजोरात आरडाओरडा केला. अलकाबाईचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली.

घारगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले

याबाबत घारगाव पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चार बालकांचा नाहक बळी

गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक नेते, वायरमन, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाहणी केली.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.