नाशिकनंतर आता सांगलीत आगडोंब, कारला लागलेल्या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू

तासगाव तालुक्यातील बलवाडी येथील मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असायचा. त्याचा फळांचा आणि केळी निर्यातीचा व्यवसाय होता.

नाशिकनंतर आता सांगलीत आगडोंब, कारला लागलेल्या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू
कारला लागलेल्या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 6:46 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत 10 जण होरपळल्याची घटना ताजी असतानाच आता सांगलीतही अशाच प्रकारे घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील पलूस शहरात एका कारला अपघात (Car Accident) झाला. अपघातानंतर कारने पेट घेतलेल्याने कारमधील तरुणाचा होरपळून मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीतील खानापूर (Khanapur Sangli) तालुक्यात बलवडीमध्ये घडली आहे. मकबूल गौसलाजम पटेल असे 25 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.

कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

मयत तरुण पलूस शहरातील जुना सातारा रोडवरुन चालला होता. यावेळी आंधळी फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. अपघातानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारचालक तरुणासह गाडी जळून खाक झाली.

पहाटेच्या सुमारास घटना उघडकीस

अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने या घटनेची माहिती तात्काळ मिळू शकली नाही. त्यामुळे पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी पेटलेली गाडी पाहून टोल फ्री नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मकबूल याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

मयत तरुण फळे आणि केळी निर्यातीचा व्यापारी

तासगाव तालुक्यातील बलवाडी येथील मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असायचा. त्याचा फळांचा आणि केळी निर्यातीचा व्यवसाय होता. अपघाताच्या दिवशीही त्याने घरी यायला रात्री उशीर होईल असे फोन करून सांगितले होते.

पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याच्या जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. मकबूलच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता. मकबूलच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.