विनायक डावरुंग, TV9 मराठी, नाशिक : शनिवारची सकाळ अपघाताच्या एका मोठ्या बातमीने उजाडली. पहाटे पाच-साडे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ चिंतमणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) खासगी बसचा भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला. यवतमाळमधील (Yavatmal) पुसदहून मुंबईच्या दिशेनं ही बस जात होता. पण वाटेतच कोळशाने भरलेला ट्रक आणि लक्झरी बस यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा अपघात घडला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आणि बसमधील प्रवासी आगीत होरपळले. या अपघाताबाबतची माहिती कशी कळली, याबाबत चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.