पिंपरी चिंचवडमध्ये सुन्न करणारी घटना, तरुणीने लग्नास नकार दिला, नराधमाकडून क्रूर कृत्य, पुणे हादरलं

पिंपरी चिंचवडमध्ये एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या केली आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे संबंधित परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये सुन्न करणारी घटना, तरुणीने लग्नास नकार दिला, नराधमाकडून क्रूर कृत्य, पुणे हादरलं
पिंपरी चिंचवडमध्ये सुन्न करणारी घटना, एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 4:23 PM

राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पनवेलच्या उरण येथील घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. असं असताना पनवेल येथील न्हावा गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या दोन घटनांनंतर पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून देखील अशीच एक सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील महाळूंगे पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण येथे काल रात्री प्राची विजय माने या 21 वर्षाच्या तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून प्राची माने हिचा खून करण्यात आला असं आता पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. प्राची मानेच्या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-3 पोलीस पथकाने अविराज रामचंद्र खरात या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपीचं क्रूर कृत्य

प्राची ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची मूळ रहिवासी होती. त्याच भागातील अविराज रामचंद्र खरात याला प्राचीने लग्नास नकार दिला होता. त्यानंतर प्राची ही महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण या भागात वास्तव्यास आली होती. प्राचीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अविराज रामचंद्र खरात यांनी आंबेठाण या ठिकाणी येऊन प्राचीच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून तिचा खून करून पसार झाला होता.

मात्र, पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 पोलीस पथकाने घटनास्थळा जवळील आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले. या सीसीटीव्हीत अविराज रामचंद्र खरात हा सांगलीकडे आपल्या मोटरसायकलवरून पळत जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी आरोपी अविराजला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.