Pune Burnt : पुण्यात अंत्यविधीवेळी रॉकेलच्या कॅनचा भडका उडाला, नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला आलेले 11 जण भाजले

| Updated on: May 01, 2022 | 1:22 AM

महात्मा फुले वसाहतीत राहणारे दीपक प्रकाश कांबळे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व नातेवाईक संध्याकाळी कैलास स्मशानभूमीत जमले होते. अंत्यविधी करताना सरणावरील लाकडांनी लवकर पेट घ्यावा म्हणून कॅनमधून रॉकेल टाकत असताना रॉकेलच्या कॅनने पेट घेतला.

Pune Burnt : पुण्यात अंत्यविधीवेळी रॉकेलच्या कॅनचा भडका उडाला, नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला आलेले 11 जण भाजले
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : अंत्यविधीवेळी रॉकेलच्या कॅनचा भडका उडून 11 जण भाजल्या (Burnt)ची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सर्व जखमी मयताचे नातेवाईक आहेत. सर्व जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत. आज संध्याकाळी कैलास स्मशानभूमीत ही घटना घडली. परिसरातील एक मयत नागरिक दीपक कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. आशा प्रकाश कांबळे (59), येणाबाई बाबू गाडे (50), निलेश विनोद कांबळे (35), शिवाजी बाबुराव सूर्यवंशी, वसंत बंडू कांबळे, दिगंबर श्रीरंग पुजारी, हरिश विठ्ठल शिंदे (40), आकाश अशोक कांबळे, शशिकांत कचरु कांबळे, अनिल बसन्ना शिंदे अशी जखमींची नावे आहेत. तर एका व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. हे सर्व 30 ते 35 टक्के भाजले आहे. (At least 11 people were burnt when a can of kerosene exploded during a funeral procession in Pune)

कशी घडली दुर्घटना ?

महात्मा फुले वसाहतीत राहणारे दीपक प्रकाश कांबळे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व नातेवाईक संध्याकाळी कैलास स्मशानभूमीत जमले होते. अंत्यविधी करताना सरणावरील लाकडांनी लवकर पेट घ्यावा म्हणून कॅनमधून रॉकेल टाकत असताना रॉकेलच्या कॅनने पेट घेतला. कॅनने पेट घेतल्याने सदर व्यक्तीने हातातील कॅन फेकल्याने अधिक भडका उडून शेजारील व्यक्तींना आगीची झळ घालून ते यात भाजले. सर्वांना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांवर उपचार सुरु आहेत. (At least 11 people were burnt when a can of kerosene exploded during a funeral procession in Pune)

हे सुद्धा वाचा