पुण्यात टोळीयुद्ध वाढली, सहा महिन्यात हत्येच्या प्रयत्नाचे 139 गुन्हे, 38 हत्याकांड

| Updated on: Jun 29, 2021 | 2:24 PM

पूर्ववैमनस्यातून भिडणाऱ्या टोळ्यांमुळे यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत 530 गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली होती. गेल्या वर्षा हाच आकडा 410 इतका होता. संघटित गुन्हेगारीचा मागोवा पुणे पोलीस घेत असल्यामुळे हत्येच्या प्रयत्नाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले जात आहेत

पुण्यात टोळीयुद्ध वाढली, सहा महिन्यात हत्येच्या प्रयत्नाचे 139 गुन्हे, 38 हत्याकांड
पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ
Follow us on

पुणे : एकीकडे नागपूरची क्राईम सिटी म्हणून ओळख होत असतानाच पुणे शहरातही गुन्ह्यांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. 2021 मधील पहिल्या सहा महिन्यातच पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 95 ने वाढला आहे. तर या सहा महिन्यात हत्येची 38 प्रकरणं उघडकीस आली आहेत. (Attempt to murder cases rises to 130 murders to 38 Pune city faces rise in crimes)

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांची चिंताही वाढवणारी आहे. जानेवारी ते जून 2021 या कालावधीत पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे एकूण 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात हा आकडा 44 इतकाच होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल 95 ने वाढली आहे. तर यावर्षी पहिल्या सहा महिन्यात 38 जणांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे, गेल्या वर्षी हा आकडा 36 इतका होता.

गँगवॉरमुळे पोलिसांना डोकेदुखी

संघटित गुन्हेगारीचा मागोवा पुणे पोलीस घेत असल्यामुळे हत्येच्या प्रयत्नाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले जात आहेत. गुन्हेगारांच्या जवळपास 30 टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. पूर्ववैमनस्यातून भिडणाऱ्या टोळ्यांमुळे यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत 530 गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली होती. गेल्या वर्षा हाच आकडा 410 इतका होता.

पुण्याच्या कोणत्या भागात टोळीयुद्ध?

पुण्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरातही गुन्हेगारी टोळ्या वाढताना दिसत आहेत. एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून किंवा जाहीर अपमान केल्याच्या भावनेतून हत्येच्या प्रयत्नाच्या केसेस वाढत असल्याचं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. टोळीयुद्धांमुळे गुन्हेगारी वाढल्याकडेही पोलिसांनी लक्ष वेधलं. बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, वानवडी, सिंहगड रोड या भागात दोन गटांमधील वादाच्या तक्रारी अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या माहितीनुसार “गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांमुळे नागरिक घरातच बसून होते. मात्र यंदा निर्बंध असूनही नागरिक शहराच्या विविध भागांत फिरताना दिसत आहेत, ही पोलिसांसाठी चिंतेची बाब आहे. हत्येच्या बहुतांश गुन्ह्यांची उकल झाली आहे, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये संपूर्ण तपास केला जात आहे. ”

संबंधित बातम्या :

पुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले

(Attempt to murder cases rises to 130 murders to 38 Pune city faces rise in crimes)