सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तरुणाची सुसाईड नोट, पण त्याआधी पत्नीचा फिनायल पिवून आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे या तरुणाने काल (22 ऑगस्ट) आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तरुणाची सुसाईड नोट, पण त्याआधी पत्नीचा फिनायल पिवून आत्महत्येचा प्रयत्न
पुण्यात तरुणाची आत्महत्या

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे या तरुणाने काल (22 ऑगस्ट) आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात त्याने सासरच्यांच्या जाचाला कटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण आता या प्रकरणाची आणखी दुसरी बाजू समोर आली आहे. मृतक तरुणाच्या पत्नीने त्याच्या मृत्यूआधी फिनायल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

मृतक निखिलच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी शौचालय स्वच्छ करण्याचे औषध पिल्याचे समोर आलं आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार केले गेले असून ती गर्भवती देखील आहे, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. दुसरीकडे निखिल मानसिक तणावात असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याचे मित्र सांगत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर तिथे मृत्यू पत्र म्हणून चिठ्ठी सापडली होती.

सुसाईड नोटमध्ये काय?

सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमध्ये केली आहे.

आईसाठी भावनिक संदेश

आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे असेही चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. निखिलचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं होतं.

हेही वाचा :

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या

पैसे दिले नाहीत म्हणून राग, आईची धारदार शस्त्राने हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI