Pune | ज्यासाठी आटापिटा केला नेमकं तेच घडलं, दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस पलटी

| Updated on: Apr 07, 2023 | 7:42 PM

दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नात एसटी बस पलटी झाल्याची दुर्घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. संबंधित घटना घडली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली.

Pune | ज्यासाठी आटापिटा केला नेमकं तेच घडलं, दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस पलटी
Follow us on

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नात एसटी बस पलटी झाली. या अपघातात एसटीमधील प्रवाशांना इजा झाली नाही. पण एसटी शेजारी असणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. एसटी बस पलटी झाल्याने आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने स्थानिक गावातील गावकरी धावले. गावकऱ्यांनी एसटीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. पण एका दुचाकीस्वाकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली. या अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ टू व्हीलर आणि एसटी बसचा हा अपघात झाला. यामध्ये राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली. खरंतर एसटी चालक दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण यावेळी बस रसत्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पलटी झाली. यावेळी एसटी आणि दुचाकीची धडक झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

बसमधील 29 प्रवासी सुखरुप

एसटी महामंडळाची ही बस पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने टू व्हीलर चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी ही बस देखील पलटी झाली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आलंय. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये 29 प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला.