AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईहून शिर्डीला देवदर्शनासाठी चालले होते भाविक, पण थेट रुग्णालयातच पोहचले !

मुंबईतील ज्वेल फिश ट्रॅव्हलची खाजगी बस भाविकांना घेऊन शिर्डीला दर्शनासाठी चालली होती. मात्र नाशिक-मुंबई महामार्गावरुन जात असतानाच विपरीत घडले.

मुंबईहून शिर्डीला देवदर्शनासाठी चालले होते भाविक, पण थेट रुग्णालयातच पोहचले !
मुंबईहून शिर्डीला दर्शनासाठी चाललेल्या बसला अपघातImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 07, 2023 | 3:49 PM
Share

नाशिक / शैलेश पुरोहित : मुंबईहून शिर्डीला दर्शनाशाठी चाललेल्या बसला नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर 12 जण जखमी झाले. मेहमूद सुभेदार शेख असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नाशिक मुंबई महामार्गावर आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर ही घटना घडली. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या लक्सरी बसने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घोटी येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घोटी टोलच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईहून शिर्डीला दर्शनासाठी चालली होती बस

मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर एक ट्रक नादुरस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोन लावण्यात आले होते. यादरम्यान ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची खाजगी बस मुंबईहून प्रवाशांना शिर्डीकडे दर्शनाला जात होती. बसच्या चालकाला पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघातात ट्रक चालक जागीच ठार

या धडकेत ट्रकच्या मागे काम करणारा ट्रक चालक मेहमूद सुभेदार शेख हा जागीच ठार झाला. बस चालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून, इतर 11 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत काही जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णांना विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच