AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज, पदवीधर तरुणाने वापरला चोरीचा फंडा, अखेर…

पुण्यात मौजमजा करण्याकरीता महागड्या मोटर सायकली चोरी करणाऱ्या पदवीधर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोटारसायकल चोरी करुन तो सोशल मीडियाच्या माध्यमातून विकत होता.

मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज, पदवीधर तरुणाने वापरला चोरीचा फंडा, अखेर...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 13, 2025 | 9:12 AM
Share

शिक्षण घेतल्यानंतर त्याचा वापर रोजगारासाठी केला जातो. पदवी घेतल्यानंतर नोकरी करुन जीवनात स्थैर्य आणले जाते. परंतु पदवी घेतल्यानंतर केवळ मौजमजा करण्यासाठी कोणी चोरी करेल का? पुणे पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या एका आरोपीला पकडले आहे. पदवीधर असलेला हा आरोपी केवळ मौजमजा करण्यासाठी मोटारसायकलींची चोरी करुन विक्री करत होता.

पोलिसांनी केल्या गाड्या जप्त

पुण्यात मौजमजा करण्याकरीता महागड्या मोटर सायकली चोरी करुन त्या ऑनलाईन फंडा वापरुन विक्री करणाऱ्या महादेव शिवाजी गरड (वय २६) याला अटक केली आहे. पुणे पोलिस गुन्हे शाखा युनिट पाचने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून होंडा सी.बी.शाईन मोटर सायकल (MH-१५/GH/९१४८ व युनिकॉर्न मोटर सायकल (MH-११/CT/२९१४) जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखीन काही होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटर सायकल चोरल्याचे म्हटले आहे.

चोरी करुन या पद्धतीने विक्री

शिवाजी गरड चोरी केलेल्या मोटारसायकली फेसबूकमधील Marketplace वरुन विकत होता. मोटर सायकलचे हफ्ते थकल्याने फायनान्स कंपनी गाडी जप्त करणार असल्याचे तो लोकांना सांगत होता. खोटी कारणे सांगून त्याने मोटारसायकली विकल्या. त्याने १२ युनिकॉर्न मोटर सायकल व त्याच्या ताब्यातील २ मोटर सायकल अशा एकूण १४ दुचाकी वाहने चोरले. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील ६, काळेपडळ पोलीस स्टेशन भागातील तीन, चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनकडील दोन तर सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन कडील तीन असे एकूण १४ वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

पोलिसांकडून अंमली साठा जप्त

पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अंमली साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने छापेमारी करत ८ लाख रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. हे आरोपी राजस्थानमधून पुण्यात तस्करी करत होते. राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सिताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख, महेश नारायण कळसे अशी त्यांची नावे आहेत.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं