AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात बांधकाम व्यवसायिकांने थेट म्हाडालाच गंडवले; शासकीय योजनेच्या फायद्यासाठी केली फसवणूक ; गुन्हा दाखल

पुणे म्हाडा येथे बनावट प्रतिज्ञापत्र , हमीपत्र व खोटे प्लॅन सादर करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये गोयल यांनी म्हाडासह तब्बल 56 सदनिका धारकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे म्हाडाने बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात बांधकाम व्यवसायिकांने थेट म्हाडालाच गंडवले; शासकीय योजनेच्या फायद्यासाठी केली फसवणूक ; गुन्हा  दाखल
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 11:49 AM
Share

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरी येथे प्रकल्प उभारताना नामांकित बांधकाम व्यावसायिकाने शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांनी पुणे म्हाडा येथे बनावट प्रतिज्ञापत्र , हमीपत्र व खोटे प्लॅन सादर करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये गोयल यांनी म्हाडासह तब्बल 56 सदनिका धारकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे म्हाडाने बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत पुणे गुर्हा निर्माण वक्षेत्रविकास महामंडळाच्या मुख्य उपभियांता आशा हेमंत भोसले यांनी गोयाल व देशपांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

अशी केली फसवणूक बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल यांनी धानोरी येथील सर्व्हे क्रमांक24/1/2/3/4/5/10 व सर्व्हे क्रमांक 67 / 1 बी /10 या मिळकतीवर ईडब्लूएस व एलआयजी धारकांसाठी ५६ सदनिकांची स्वतंत्र योजना उभारली. गोयल यांनी स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेत , म्हाडासाठी योजना राबवत असताना बांधकामाच्या बदल्यात अधिकचा एफएसआयचा फायदा घेतला. याबाबत म्हाडाच्या कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र , हमीपत्र देत म्हाडासह 56 सदनिकाधारकांची फसवणूक केली.

शासकीय योजनेच्या फायद्यांसाठी केली फसवणूक शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे याने खोटे व रचनात्मक बिल्डिंग प्लॅन तयार केले. हे खोटे प्लॅन म्हाडाकडे सादर करत ते मंजूर करून घेतले. त्यामध्ये बिल्डरने तब्बल 56 सदनिका धारकांची फसवणूक केली आहे.

Winter Care Tips : हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल, भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीचं प्रकरण, एका एसीपीविरोधातही एफआयआर

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.