पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 12:05 PM

पुणे : गुरं बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 29 वर्षीय शेतकरी महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोघा जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. गेल्या काही महिन्यात पुणे परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहेत.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरं- ढोरं बांधत होती. त्यावेळी आरोपी अनिल आणि महेश तिथे अचानक गेले. त्या नंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी अनिल आणि महेश यांनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 या काळात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

कुटुंब आनंदात निघालेलं, हायवेवर अचानक कारमध्ये गोळी घुसली, दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर

VIDEO | धक्का लागल्याचे निमित्त, तरुणावर जीवघेणा हल्ला, गावगुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद