कामावरुन वाद, HR ला रस्त्यात अडवून गाडी फोडली, पुण्यात गंभीर प्रकार

| Updated on: Feb 26, 2022 | 1:15 PM

कामावरून वाद झाल्याने रस्त्यात अडवून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कंपनीत कामावरुन एका कामगाराचा वरिष्ठासोबत वाद झाला होता. त्या रागातून कामगाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एचआरला रस्त्यात अडवत दहशत निर्माण केली.

कामावरुन वाद, HR ला रस्त्यात अडवून गाडी फोडली, पुण्यात गंभीर प्रकार
सहा आरोपींना अटक
Follow us on

पुणे : कामावरुन वाद झाल्यानंतर एचआर म्हणजेच ह्युमन रिसोर्स अधिकाऱ्याला (HR) रस्त्यात अडवून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित कंपनीच्या एचआरच्या कारवर दगडफेक (Stone Pelting on Car) करण्यात आली. पुणे जिल्ह्यात (Pune Crime) हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या टोळक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चाकण महाळुंगे पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. मात्र या भीषण घटनेमुळे कंपनीच्या एचआरसह अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील या घटनेने सर्वत्र घबराट पसरली असून एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कामावरून वाद झाल्याने रस्त्यात अडवून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कंपनीत कामावरुन एका कामगाराचा वरिष्ठासोबत वाद झाला होता. त्या रागातून कामगाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एचआरला रस्त्यात अडवत दहशत निर्माण केली. तसेच एचआरच्या कारवर दगड मारुन नुकसान केले होते. ही घटना 28 जानेवारी रोजी सावरदरी येथे घडली होती.

नेमकं काय घडलं?

सुप्रीम फॅसिलिटीच्या माध्यमातून रिलायन्स वेअर हाऊस (भांबोली, ता. खेड, जि. पुणे) या ग्रोसरी वेअर हाऊसचे कामकाज पाहणारे उदय धर्मराज पिसाळ हे 28 जानेवारीला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घरी जात होते. यावेळी फिलिप्स कंपनी सावरदरीजवळ पोहोचले असताना आरोपींनी पिसाळ यांच्या कारच्या दोन्ही बाजूंनी ओव्हरटेक करत दोन बुलेट बाईक आडव्या घातल्या. त्यानंतर जोरजोराने हॉर्न वाजवत त्यांना गाडी थांबवण्यास सांगण्यात आले. तर गाडीचा वेग कमी झाल्यावर एकाने दगड मारला. या प्रकरणी पिसाळ यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

या गुन्ह्यातील सहा जणांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण महाळुंगे पोलिसांनी ही कामगिरी केली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आऱोपींना बेड्या ठोकल्या. प्रल्हाद बच्चे, समीर कारले, अक्षय घाडगे, अक्षय ऊर्फ सुधीर सोनवणे, रुपेश वाळके, सचिन विरकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, बिबवेवाडीत कारवर सिमेंट ब्लॉक टाकणारे दोन गुंड अटकेत

पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका

खेड घाटातील 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनी आधी दारु पाजली मग…