इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

| Updated on: Nov 03, 2021 | 12:35 PM

47 वर्षीय महिलेशी इंस्टाग्रामवर ओळख करुन अनोळखी व्यक्तीने तिला ऑनलाईन लुटले. परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्यासाठी तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केली

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने महिलेला 10 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेची तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?

47 वर्षीय महिलेशी इंस्टाग्रामवर ओळख करुन अनोळखी व्यक्तीने तिला ऑनलाईन लुटले. परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्यासाठी तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केली. पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पायलट असल्याचं सांगून फसवणूक

2 ते 29 एप्रिल 2021 दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने परदेशात पायलट असून भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितलं होत. मात्र आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

डेटिंग अॅपवर ओळख, महिलेची फसवणूक

याआधी, आयटी अभियंता असलेल्या महिलेला ‘टिंडर’ या डेटिंग अॅपवर झालेली ओळख चांगलीच महागात पडल्याचा प्रकार समोर आला होता . लग्नाचे अमिष दाखवून महिलेची 73 लाख 59 हजार 530 रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित 35 वर्षीय आयटी अभियंता महिलेने पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनियल साईटवर 100 महिलांना गंडा, 25 कोटींची लूट, परदेशी नागरिकासह तिघे अटकेत

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त