काय सांगता ? चक्क झाड फेकून मारत गुन्हेगाराला अटक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांचा दावा, वस्तुस्थिती काय?

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांवर वाळलेले झाड फेकून मारत त्यांना जखमी केलं. यावेळी कृष्ण प्रकाशही किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

काय सांगता ? चक्क झाड फेकून मारत गुन्हेगाराला अटक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांचा दावा, वस्तुस्थिती काय?
Krushan Prakash
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 6:14 PM

पिंपरी – गुन्हेगारीच्या बाबतीत पिंपरी- चिंचवड हे युपी-बिहार बनत चालले असताना दुसरीकडं पिंपरी चिंचवडचे आयुक्त गुन्हेगारांवर अगदी दाक्षिणात्य चित्रपटातील हिरोप्रमाणे कारवाई केल्याच्या किस्से सुनावण्यात रमामानं झालेले दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर गुन्हेगारांवर कारवाई करताना पोलीस आयुक्तांनी थेट चित्रपटातील हिरोप्रमाणे झाड फेकून मारत , गुन्हेगाराला अटक केल्याचा दावा केला आहे.  त्यांच्या या दाव्याची आज संपूर्ण शहरभर चर्चा रंगली आहे.

तर झाले असे… दोन आठवड्यापूर्वी सांगवीतील काटेपुरम चौकात योगेश जगताप या व्यवसायिकांची सकाळी साडे दहा वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भर दिवसा घडलेल्या या हत्येमुळे शहरात खळबळ निर्माण झाली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित झाले. पुढ़े पोलिसांनी या हत्येप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केले. इतकाच नव्हे तर त्यातील दोन आरोपीना पकडले. मात्र ते मुख्य आरोपी नव्हतेच. दुसरीकडे या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पकडण्याची पोलिसांच्या चार टीम तैनात करण्यात आल्या अन आरोपींचा शोध सुरु झाला. त्यानंतर तब्बल दोन आठवडे उलटून गेलयानंतर पोलिसांना आरोपी चाकणमधील कोय परिसरात लपाल्याची माहिती मिळाली. पुढे पोलिसांच्या टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या. यामध्ये पोलीस आयुक्तही सहभागी होते( पोलीस डायरीतील नोंदीनुसार) तिथे पोहचल्यानंतर आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रतिउत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र पोलिसांवर गोळीबार झाल्याच बातमी सर्व शहरभर पसरली, इतकच नव्हेत तर यात पोलीस आयुक्त जखमी झाल्याचे सांगण्यात आले. पण नेमक कसे जखमी झाले हे मात्र सांगण्यात येत नव्हते . सराईत गुन्हेगाराला पकडताना पोलीस आयुक्त जखमी यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला

आश्चर्यकारक माहिती आलीसमोर पोलीस आयुक्त जखमीची चर्चा शहरभर होताच ,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी ह्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केलं. मात्र बैठकांच की कारण देत पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. यामुळे आणखीनच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मग मात्र या कारवाई वेळी झाडा झुडपांत लपलेल्या आरोपींना पकडताना, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांवर वाळलेले झाड फेकून मारत त्यांना जखमी केलं. यावेळी कृष्ण प्रकाशही किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तर अश्या प्रकारेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आयुक्त कृष्ण प्रकाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

या धडाकेबाज कारवाईची पत्रकार परिषद का नाही?

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एरवी अगदी एक सोनसारखी चोर पकडला तरी त्याच्यावरील कारवाईची इथंभूत माहिती सांगणारी पत्रकार परिषद होते. बहुतांश वेळा ही पत्रकार परिषद माननीय पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडते. मात्र आज एवढी मोठी गोळीबाराची घटना होवूनही पत्रकार परिषद घेण्यात आलेली नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकच नव्हे तर कारवाई वेळी आयुक्तांनी झाड फेकून मारल्याच्या इतकी मोठ्या घटनेकडे  दुर्लक्ष कसे अशी चर्चाही रंगली आहे.

गुन्हेगारीमुक्त शहर होणार की…

या सगळ्यामध्ये शहरात दिवसाढवळ्या वाढत असलेलया हत्येचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होणार का? तरुणीपासून ते अल्पवयीन मुलींवर होणारेअत्याचार थांबणार का? बेकायदेशीर रित्या राजसरोपणे शस्त्रांची होणारी विक्री थांबवण्यासाठी काही कारवाई होणार का? पैश्याच्या जीवावर स सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या गाव गुंडांचा बंदोबस्त कधी होणार? शहरातील वाहन चोरीचे प्रकार थांबणार का ? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुउत्तरीतच  आहेत.

दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ

Pune Crime | गावठी कट्टा विक्रीला घेऊन आलेलया तिघांच्या आळेफाटा पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; एक फरार

बॉयफ्रेण्डसोबत वाजलं, 14 व्या मजल्यावरुन उडी मारत परदेशी युवतीची आत्महत्या

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.