AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police woman Suicided | पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

पुणे पोलिस दलाच्या विशेष विभागात शिल्पा चव्हाण कार्यरत होत्या. घटनेच्या वेळी त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिल्पा चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

Police woman Suicided |   पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
shilpa chvhan
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 2:54 PM
Share

पुणे – शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या पोलीस दलातील गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.  विश्रांतवाडी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं पुणे पोलिस दलाच्या विशेष विभागात शिल्पा चव्हाण कार्यरत होत्या. घटनेच्या वेळी त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिल्पा चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेच्या वेळी घरात दुसरी कोणतीही व्यकती नव्हती. शिल्पा यांना एका मुलगा असून तो गावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील काही महिन्यापूर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्या सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अदयाप कळू शकलेली नाही. पोलीस दलात त्याच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

संयमी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध

पोलीस दलात कार्यरत असलेल्या शिल्पा चव्हाण या कामात अत्यंत सर्तक अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. पोलिस दलात त्या अत्यंत सयंमी व प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.

हे काय? तीन हात, तीन पायांचं बाळ! बिहारमध्ये विचित्र स्थिती, सोनोग्राफीलाही चकवा!

अवकाळी, गारपिटीने सर्वाधिक नुकसान विदर्भाचे, भरपाईच्या अनुशंगाने प्रशासनाचे काय आहे नियोजन?

Year Ender 2021 : ‘सरदार उधम’ ते ‘सायना’, यंदा बॉलिवूडमध्ये बायोपिक्सची धमाल!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.